abvp sakal sanwad 
जळगाव

दीड वर्षापासून ‘फोकस’ बदलून सेवाकार्यावर : प्रा. प्रशांत साठे

दीड वर्षापासून ‘फोकस’ बदलून सेवाकार्यावर : प्रा. प्रशांत साठे

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम होत नसले तरी ऑनलाइन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी ‘कनेक्ट’ कायम आहे. या काळात परिषदेचा ‘फोकस’ बदलून तो सेवाकार्यावर देण्यात आल्याचे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रांतप्रमुख प्रा. प्रशांत साठे (पुणे) यांनी व्यक्त केले. (jalgaon-abvp-prashant-sathe-sakal-sanwad-lockdown-student-education-work)

‘सकाळ’च्या जळगाव शहर कार्यालयात संपर्कानिमित्त सदिच्छा भेट दिली, त्या वेळी विविध विषयांवर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत परिषदेचे जळगाव जिल्ह्यातील पूर्णवेळ कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर उद्देवार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी कनेक्ट

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे देशातील सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. शैक्षणिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यामुळे परिषदेसह सर्वच विद्यार्थी संघटनांच्या प्रत्यक्ष उपक्रमांवर मर्यादा आल्या. मात्र, या काळात परिषदेने विद्यार्थ्यांशी असलेला संपर्क कायम ठेवला आहे. महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणप्रणाली विद्यार्थी त्यात गुरफटला आहे. त्यातून त्याची मानसिकताही बदलण्याचा धोका असून, त्यासाठी त्याला विविध उपक्रमांत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न आहे.

सेवाकार्यावर भर

या काळात प्रत्यक्ष उपक्रम बंद होते. त्यामुळे समाजाची गरज ओळखून रुग्णांची तपासणी, थर्मल स्कॅनिंग, रक्तदान, प्लाझ्मादान, रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळवून देणे, रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, अंत्यविधीची जबाबदारी, गरजूंना जेवणाचे डबे पोचविणे, बाइक ॲम्ब्युलन्ससारख्या सुविधा उपलब्ध करणे यांसारख्या सेवाकार्यावर अभाविपने भर दिला. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आल्याचे प्रा. साठेंनी आवर्जून नमूद केले.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना प्रा. साठे म्हणाले, की मोदी पंतप्रधान असताना हे धोरण जाहीर झाले याचा अर्थ त्यांनी अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून ते आले असे नाही. याआधी १९८६ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना शैक्षणिक धोरण बदलले होते, तेव्हा ते त्यांनी आणले असे म्हणावे का, असा प्रश्‍न उपस्थित करत साठे म्हणाले, की या धोरणामुळे लगेच शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील, असे नाही. या धोरणाच्या योग्य व नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. कालांतराने त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT