जळगाव

अग्नावती प्रकल्प झाला फुल्ल ; ग्रामस्थ सुखावले !

शैलेंद्र बिरारी


नगरदेवळा : नगरदेवळा सह परिसराला संजीवनी ठरणारा अग्नावती प्रकल्प या वर्षी जुलै महिन्यातच पूर्णक्षमतेने भरल्याने ग्रामस्थात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरदेवळा सह परिसर पूर्णत: शेतीवर अवलंबुन असल्याने प्रकल्प भरल्याने बागायती क्षेत्रात वाढ होत असते.मुख्य पीक कापुस असुन केळी हे बागायती पीक आहे.गेल्या वर्षी नऊ वर्षा नंतर अग्नावतीला पूर आला होता.पावसाळा चांगला झाल्याने शेतकर्यांच्या विहीरिंना पाणी मुबलक प्रमाणात असल्याने प्रकल्पातून शेती साठी पाणी ऊपसा कमी प्रमाणात झाला.जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पात तीस टक्के पाणी साठा शिल्लक होता.या वर्षी सुरुवाती पासुन अग्नावती नदीच्या उगम असलेल्या मराठवाड्यातील काळदरी परिसरात दमदार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील काळदरी व किन्ही हे प्रकल्प लवकर भरलेत.त्या सोबत पिंप्री प्रकल्पही भरल्याने अग्नावती प्रकल्पातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत प्रकल्प भरल्याने ग्रामस्थांना भेडसावणारा पाणी प्रष्न देखिल मिटला आहे. ग्रामस्थांनी सद्य सथितीत पाच ते सात दिवसाआड पाणी पिले.तर त्या अगोदरच्या काळात अनेक वर्ष उन्हाळ्यात एक महिना आड देखिल पाणी पिले आहे. 

मात्र या वर्षी एक दिवसाआड ग्रामस्थांना पिण्याचे ताजे पाणी मिळणार यात शंका येण्याचे कारणच नाही.जेणे करुन ग्रामस्थांचे आरोग्य उत्तम राहिल. परिसरात मुख्य व्यवसाय शेती असल्याने मजुरांना देखिल रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन त्यावर उवलंबून असणारे व्यवसाय भरभराटीला येतील.गेल्या वर्षी प्रकल्पातील गाळ ,मुरुम,मातीचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने प्रकल्पाची खोली वाढली.त्या मुळेच पाणी साठा वाढला पर्यायाने जमिनीत पाण्याचा निचरा वाढला. जमिनीतील पाणी पातळी वाढली .या वर्षी देखिल सुरुवाती पासुनच पावसाळा चांगला होऊन प्रकल्प भरल्याने शेतकर्यांन सह ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं–चांदीचा नवा उच्चांक! ५ दिवसांत तब्बल २०,००० रुपयांची वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

How to Reach NMIA : नवी मुंबई विमानतळ आजपासून सुरु… पण Airport वर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम-जलद मार्ग कोणता?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडी गायब होणार, कसा असेल हवामान अंदाज

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT