जळगाव

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस गावागावात जाणार !

देविदास वाणी

जळगाव  ः केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर लादलेल्या तीन कृषी विधेयके काळे विधेयक आहे. ते रद्द होण्यासाठी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रातून दोन लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना दिले जाणार आहे. यासाठी जळगाव जिल्हयातून सुमारे ५ लाख सह्या प्रत्येक गावागावात जावून काँग्रेस घेणार आहे. याासठी काँग्रेसच्या सर्व पातळयावरील पदाधिकारी, सदस्य सक्रीय झाले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी प्रकाश मुगदीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वाचा- दसरा, दिवाळी कॅश करण्यासाठी डिस्काउंटचा भडिमार 

या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या रूपरेषेबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती बैठकीत देण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, युवक अध्यक्ष देवेंद्र मराठे, जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, राजीव पाटील, अविनाश भालेराव, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. 

पंधरा ऑकटोबरला राज्यभरात या विधेयकाविरोधात काळा दिवस पाळला जाणार आहे. यादिवशी राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, राहूल गांधी हे र्व्हचूअल रित्या राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदशृन करतील. यादिवशी र्व्हचूअल रॅली काढण्यात येईल. जिल्ह्यात यासाठी ३० जणांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे. जिल्ह्यातील अकरा मतदार संघात र्व्हचूअल रॅली काढण्यात येईल. दूपारी बारा ते दरम्यान प्रत्येक तालुक्यात र्व्हचूअल रित्या टीव्हीवर शेतकऱ्यांना या काळ्या कायदाविषयी सांगीतले जाईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड.पाटील यांनी दिली. 

खासदार डॉ.पाटील म्हणाले, की केंद्राने जे शेतकरी विधेयक तयार केले ते काळे विधेयक आहे. बाजार समित्यांचे स्वातंत्र हिरावणारे आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव तर मिळणार नाही उलट दलालांना पूषटी करणारे विधेयक असल्याने जोपर्यंत हे विधेयक रद्द होत नाही. तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहणार आहे. मोदी सरकार एकावर एक आपत्ती आणीत आहेत. अगोदर नोटाबंदी आणली, जीएसटी आणली, आता काळे कृषी विधेयक आणले. याला विरोध करण्यासाठी काँग्रेस विरोध करेल. 

‘भाजप’ अन्याय पक्ष 

माजीमंत्री एकनाथराव खडसे भाजप सोडतायहेत याबाबत विचारले असता, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले, भाजप पक्ष अन्याय करणारा आहे. हे खडसेंवर अन्यायावरून दिसते. खडसेच नव्हेतर अनेक पदाधिकारी भाजप सोडून जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय, नागरिकांवर अन्याय आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय करणारा भाजप पक्ष आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT