Jalgaon Airport 
जळगाव

जळगाव विमानतळावरून कार्गो सेवेला मंजुरी

विमानतळावरुन नाईट लँडिंग सुविधा यापूर्वीच सर्व निरीक्षणातून पूर्ण करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : येथील विमानतळावरुन (Jalgaon Airport)कार्गो सेवेला लवकरच प्रारंभ होणार आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालय (Ministry of Civil Aviation) संयुक्त सचिव उषा पाडवी (Secretary Usha Padvi) यांच्या सहीचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी दिली.


खासदार उन्मेष पाटील यांनी नवी दिल्ली येथे नागरी उड्डाण मंत्रालय संयुक्त सचिव उषा पाडवी यांच्या कार्यालयात भेट घेऊन तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. आज त्या अनुषंगाने कार्गो सेवेला मंजुरीचे पत्र प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते स्वत: यासाठी प्रयत्नशील होते.

स्थानिक उद्योगांना लाभ

विमानतळावरुन नाईट लँडिंग सुविधा यापूर्वीच सर्व निरीक्षणातून पूर्ण करण्यात आली आहे. आता या टप्प्यात कार्गो वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. जळगाव विमानतळ येथे शेतमाल साठवणुकीची व्यवस्था असल्याने शेतमाल वाहतुकीची देशांतर्गत व देशाबाहेर कार्गो सेवेला मान्यता मिळावी अशी मागणी केली होती. आज ही मागणी मंजूर झाल्याने लवकरच परिसरातील उद्योजक शेतकरी यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे, असा विश्‍वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.


जळगावहून पुणे, इंदूर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात जळगाव येथून अजिंठा हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- उन्मेष पाटील, खासदार, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT