Mehrun Lake संधीपाल वानखेडे
जळगाव

मेहरूण तलाव शंभर टक्के भरला..सांडव्यावरून पाणी ‘ओव्हरफ्लो’

. ‘गुलाब’ वादळाच्या प्रभावाने शहरात झालेल्या पावसाने तलाव पूर्णतः भरला

सकाळ वृत्तसेवा


जळगाव ः जळगावकरांचे नेहमीच आकर्षण असलेला मेहरूण तलाव (Mehrun Lake) नुकत्याच झालेल्या मुसळधारेने (Heavy Rain) शंभर टक्के भरला आहे. तलाव शंभर टक्के भरल्यानंतर आता तलावाच्या सांडव्यावरून पाणी पडताना होणारा खळखळ आवाज व विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी जळगावकरांची मेहरूण तलावाभोवती गर्दी होत आहे.


यंदा जुलै, ऑगस्टमध्ये अत्यल्प पाऊस झाला होता. यंदा मेहरूण तलाव पूर्णतः भरेल की नाही याबाबत शंका होती. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने तलाव अर्धा भरला. ‘गुलाब’ वादळाच्या प्रभावाने शहरात झालेल्या पावसाने तलाव पूर्णतः भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मेहरूण तलावाभोवती अनेक झाडे लावण्यात आली आहेत.

Mehrun Lake

काही अंतरावर उंच इमारतही आहेत. शांत व निसर्गरम्य वातावरणामुळे तलावाकाठी दररोज अनेक पर्यटक, जळगावकर नागरिक हजेरी लावतात. तलावाभोवती काही ठिकाणी बसण्यासाठी बाक ठेवण्यात आले आहेत. त्यावरून बसून तलावाचे, सभोवतालचे सौंदर्य डोळ्यात साठवितात. आतातर तलावच शंभर टक्के भरल्यास नागरिकांची तलावाचे पाणी व सांडव्यावरून पडणाऱ्या पाण्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT