Statue burning 
जळगाव

वादग्रस्त विधानावरून जळगावात शायर मूनव्वर राणांचा पुतळा जाळला

शायर मूनव्वर राणा यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफगणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबान विषयी वादग्रस्त विधान केले.

भूषण श्रीखंडे

जळगाव : देशातील प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा (Shire Munavvar Rana) यांनी वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) केले आहे. जळगावात याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनीपेठ पोलीस ठाण्यात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला असून सायंकाळी आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे पुतळा दहन (Statue burning)करण्यात आला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांना (Home Minister) जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector)माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.

शायर मूनव्वर राणा यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफगणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबान विषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून ते सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता आणि एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. मुनव्वर राणा यांचा जळगावात निषेध करण्यात आला असून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Statue burning


माजी महापौरनी केले पुतळ्याचे दहन
जळगाव शहरातील महर्षी वाल्मिक चौकात वाल्मिक लव्य सेना आणि महर्षी वाल्मिक बहुउद्देशीय मंडळातर्फे मूनव्वर राणा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. माजी महापौर भारती सोनवणे यांनी पुतळा दहन केला. यावेळी राणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

Collector

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
शायर मूनव्वर राणा यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना आदिवासी वाल्मिकलव्य सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे.यात मूनव्वर खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र, पालकमंत्री जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना पाठविण्यात आली आहे.

Statue burning

यांची होती उपस्थिती
मूनव्वर राणा यांच्याविरुद्ध तक्रार देताना आणि इतर प्रसंगी माजी महापौर भारती सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, किशोर बाविस्कर, दत्तात्रय कोळी, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे मोहन शंखपाळ, भरत सपकाळे, निलेश तायडे, रोहिदास ठाकरे, कमलेश सपकाळे, भैय्या पाटील, किशोर सोनवणे, ललित सोनार, युगल सोनार, विष्णू ठाकरे, मनोज रायसिंगे आदींसह इतर संतप्त नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT