जळगाव

जळगावकर सावधान : ॲक्टिव रुग्ण पुन्हा पाचशेच्या टप्प्यात 

सचिन जोशी

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या घटू लागली असून ॲक्टिव रुग्णांची संख्या थोडी कमी होत आता पाचशेच्या टप्प्यात आली आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेत रुग्णसंख्या मर्यादित राहत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. 

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरुपात येण्याची शक्यता व्यक्त होत होती. दिवाळीनंतरच्या आठवड्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढतही होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून नवे बाधित तुलनेने पुन्हा कमी आढळून येत आहेत. गुरुवारी प्राप्त अहवालात ४० नवे बाधित आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या ५४ हजार ६८३वर पोचली. तर ४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ५२ हजार ८७८ झाली आहे. गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झालेला नाही. 

आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या काही प्रमाणात घटू लागल्याने ॲक्टिव रुग्णांची संख्याही काहीशी कमी झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५०३ अॅक्टिव रुग्ण होते. त्यापैकी केवळ १६५ रुग्णांमध्ये लक्षणे असून उर्वरित ३३८ रुग्ण लक्षणे नसलेली आहेत. 



नऊ तालुक्यांत नवा रुग्ण नाही 
गुरुवारच्या अहवालानुसार जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर या ९ तालुक्यांत नवा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर जळगाव शहरात १६, भुसावळला १३, अमळनेर ३, चाळीसगाव ५, जामनेर, रावेर व बोदवड तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT