Corona  Corona
जळगाव

जळगावात सक्रिय रुग्णसंख्या आता साठच्या घरात

Jalgaon corona updet : दररोज आढळून येणारे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असा ट्रेंड कायम असल्याने सक्रिय रुग्णही घटत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची चिन्हे आहेत. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होत आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा ( Corona) उतरता आलेख सुरूच आहे. बुधवारी दिवसभरात नवीन चार रुग्ण समोर आले, तर सहा कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी गेले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या (Active Patient) आता साठच्या घरात आली आहे.


जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची चिन्हे आहेत. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. महिनाभरापासून अगदीच नगण्य म्हणजे रोजचे रुग्ण दहाच्या आत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णही घटत आहेत. बुधवारी चार हजार ६६७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर व चोपडा तालुक्यात प्रत्येकी एक असे अवघे चार नवे रुग्ण समोर आले, तर सहा रुग्ण बरेही झाले. एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६१३ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९७६ वर पोचला आहे.


सक्रिय रुग्णही घटतांय
दररोज आढळून येणारे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असा ट्रेंड कायम असल्याने सक्रिय रुग्णही घटत आहेत. बुधवारी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६२ पर्यंत खाली आली. त्यात लक्षणे नसलेले ३३ व लक्षणे असलेले २९ रुग्ण आहेत. ऑक्सिजनवर १४ व आयसीयूतील पाच असे १९ रुग्ण गंभीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT