जळगाव

मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन

मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी ही घटना पाहिल्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

कासोदा : मानवता हा धर्म फक्त बऱ्याच वेळा पुस्तकात वाचायला व ऐकायला मिळतो. परंतु कासोद्यात त्याचे प्रत्यक्ष दर्शनच घडले. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून, यावर सरकार प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावून दिले आहे.

याच कोरोनामुळे तीन मुली व एक मुलगा असलेल्या वयोवृद्ध महिला शांताबाई भाऊराव बाविस्कर (वय ७४) या महिलेचे शनिवारी (ता. २४)सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ही वृद्ध महिला गेल्या चार ते पाच दिवसांपासून आजारी असल्यामुळे या महिलेच्या अंत्यविधीस पोटची मुले व मुली तसेच नातेवाईक यापैकी कोणीही कोरोना असेल या संशयाच्या भीतीने पुढे येत नसल्याचे पाहून येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी ही घटना पाहिल्यावर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी अशपाक अली यांनी व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य अर्शद अली मुखतार अली, सद्दाम पिंजारी, मुश्रीफ पठाण, अमजद खान जाकीरअली, रियाज शेख, नफीस शेख, जमील पिंजारी, तजमुलशेख मुरसलीन शेख, तोसिफ शेख आदी मुस्लिम समाजबांधवांनी पुढाकार घेऊन या महिलेचा हिंदू रितीरिवाजानुसार रात्री उशिरा अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करून पवित्र रमजान महिन्यात हिंदू - मुस्लिम एकता अबाधित ठेवण्याचे काम या सर्वांनी पुढाकार घेत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केल्याने त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! खरेदीदारांना झटका; तुमच्या शहरात किती झाला भाव?

Priyansh Arya smashes Highest T20 score : १९ षटकार, ७ चौकार! प्रियांश आर्यने ठोकली ट्वेंटी-२०तील सर्वोच्च धावसंख्या, ख्रिस गेलचा विक्रम मोडला; द्विशतक थोडक्यात हुकले

Maharashtra Land News: भूदान जमिनींचे भवितव्य टांगणीला; कोट्यवधींचे व्यवहार; मूळ लाभार्थींचा हक्क संपल्याचा दावा

Latest Marathi News Update : कर्नाटकातील मंड्या येथे कार आणि ट्रकची धडक; २ जण ठार, ४ जखमी

Nepal earthquake Today : नेपाळमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; भारतासह भूतान आणि चीनमध्येही धक्के, पालघरही हादरले

SCROLL FOR NEXT