Corona 
जळगाव

अनाथ झालेल्या मुलांच्या मागे शासन खंबीरपणे उभे-मंत्री पाटील

महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना (Corona) कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या २०, एक पालक गमाविलेल्या ३५९ अनाथ बालकांच्या (Orphan) शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून अनाथ मुलांच्या मागे शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे आहे. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ (Under Mission Vatsalya) अनाथमुले व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी आज केले.

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी अजिंठा शासकीय विश्रामगृह ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

विधवा महिलांना लाभ

मंत्री पाटील म्हणाले, की कोविड काळामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील ३३७ महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे. सदर ३३७ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनाथ मुले व विधवा महिलांसाठी कार्य करण्यास तत्पर राहावे. यावेळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, ॲड. प्रदीप पाटील, आयडीबीआयचे व्यवस्थापक विशाल भालेराव, महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, पर्यवेक्षाधीन अधिकारी संजय पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार, महिला बाल विकासाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. आभार योगेश मुक्कावार यांनी मानले.

नोकरीत १ टक्का आरक्षण

मंत्री पाटील यांच्या हस्ते कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या २० अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांना दरमहा ११०० रुपये मिळणार असून त्यांना शासकीय नोकरी कामी १ टक्का आरक्षण मिळणार आहे. सज्ञान झाल्यावर सदर मुला मुलींना व्याजासह रक्कम मिळणार असल्याने त्यांना शासनातर्फे मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

मोठी बातमी! १८ वर्षांत सोलापुरातील ५८ डीएड महाविद्यालयांना कुलूप; यंदा प्रवेश क्षमता १५०० अन्‌ शिक्षक होण्यासाठी अर्ज केले अवघ्या १०३८ विद्यार्थ्यांनीच

Panchang 5 july 2025: आजच्या दिवशी शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT