जळगाव

जळगाव जिल्ह्याला कोरोनाचा पून्हा विळखा, बाधितांचा आकडा वाढला  

भूषण श्रीखंडे

जळगाव : गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असतांना आज ४४३ नविन कोरोना बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चोविसात मृत्यूचे प्रमाण देखील वाढले असून सात जणांचा मृत्यू झाला असून  जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५० हजार ६६५ ऐवढी संख्या झाली आहे. तसेच आज ४६५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.  

जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत असताना आज अचानक नविन बाधित रुग्ण संख्येत दुप्पटने वाढ झाली आहे. त्यामुळे काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना बाबत दिलासादायक असणारे चित्र आता चिंता वाढवणारे पून्हा निर्माण झाले आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाणे, तसेच मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले होते. परंतू आज सात जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य  यंत्रणेची पून्हा झोप उडाली आहे. गुरूवारी दिवसभरात ४४३ नवे बाधित रुग्‍ण आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या ५० हजार ६६५ वर पोचली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण थोडे जास्त असून गुरूवारी ४६५ जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ४५ हजार ७७५वर पोचली आहे. सद्यःस्‍थितीत चार हजार ५१३ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९०.३५ टक्क्यांवर आला आहे. 

मृत्यूचे संख्या पुन्हा वाढली
गेल्या आठ दिवसात झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. दररोज दोन-तीन असे मृत्यू होत असतांना गुरूवारी अचानक सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणासोबत प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. त्यात नविन बाधितांची देखील आज संख्या वाढल्याने ही आकडेवारी चिंताजनक आहे. 

जामनेर-मुक्ताईनगर हॉटस्पॉट
गेल्या अऩेक दिवसापासून जळगाव शहरात कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार येत होता. मात्र गेल्या काही दिवसापासून जामनेर मध्ये कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार येत असल्याने जामनेर शहर हॉटस्पॉट बनले आहे. त्याच सोबत आज मुक्ताईनगर येथील १४१ नविन बाधितांचा आकडा आल्याने मुक्ताईऩगरात तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झालेले आहे.  

असे आढळले रुग्‍ण 
जळगाव शहर ६३, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ २०, अमळनेर २२, चोपडा १४, पाचोरा ४, भडगाव ६, धरणगाव ३, यावल ७, एरंडोल ७, जामनेर११३, रावेर १३, पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्‍ताईनगर १४१, इतर जिल्ह्यातील ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT