जळगाव

कोरोना मुक्तीसाठी...24 तासात होणार 51 लाख मंत्रजाप !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः आचार्य श्री पुष्पदंत सागर जी महाराज यांचे सर्वोच्च शिष्य, भारत गौरव साधना महोदती आचार्य श्री 108 प्रसन्न सागर जी गुरुदेव यांच्या 51व्या अवतरण दिवशी, देशभरातील गुरुभक्त एक नवा इतिहास रचणार आहेत.  मुनि श्री 108 पियुष सागर जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जगभरातुन गुरुभक्त मिळुन आपपाल्या घरी 51 लाख मंत्र जपांचे पठण करणार आहे. 

संपूर्ण जग हे आज कोरोनाच्या संकटात वावरत आहे, दिवसेगणिक हे संकट वाढत आहे. या संकटातुन सर्वांची सुटका व्हावी याउद्देश्याने हे जाप 23 जुलै रोजी फेसबुकच्या माध्यमातुन होणार आहे. कार्यक्रमासाठी विवेक गंगवाल कलकत्ता बंटी भाई अहमदाबाद, नितेश पाटणी इचलकरंजी, विपुल जयपूर, सुरेंद्र सेठी नोंदणी करीत आहेत. रोहित बाकलीवाल, पारस लोहाडे, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल म्हणाले की गुरुदेवाच्या 51व्या अवतार दिवशी आम्ही घरी बसुन गुरुदेवच्या चरणी नमन अर्पण करुन एक नवा इतिहास घडवणार आहोत औरंगाबाद, मालेगांव, इचलकंरजी धुलीयान नाशिक, कोलकाता, मुंबई, किशनगंज, जयपुर, पदमपुरा, बडोदा, इंदौर, अहमदाबाद, उदयपुर, मेरठ, काठमांडु, बडनगर, भोपाल, उज्जेन, डिमापुर, भिंड, वाराणसी, चेन्नई, बॅगलोर आदि ठिकाणाहुन भक्तगण जाप करणार आहे. सध्या आचार्यश्री मुरादाबाद युपी येथे असुन 1 वर्षापूर्वी त्यांचे नाशिक येथे आगमन झाले होते. त्यावेळेस गजपंथा तीर्थक्षेत्र य़ेथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 4 दिवसीय या कार्यक्रमात हजारों भाविकांनी त्यांचे दर्शनलाभ घेतले होता. 

२४ तासात ५१ लाख मंत्र जाप
अवघ्या 24 तासांत मुर्शिदाबाद नमोकार चैनच्या माध्यमातून 51 लाख मंत्र जाप होणार आहे. नाशिक मधुनही शेकडों भक्तांच्या माध्यमातुन लाखों मंत्रजाप होणार आहे अशी माहिती पारस लोहाडे, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पैसे द्या, नाहीतर बुधवार पेठेत गेल्याचं सांगू; बदनामीची धमकी देत लुटणाऱ्या दोघांना अटक

संतापजनक! शिक्षणाच्या नावाखाली विकृतीचा कळस; नोट्स देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार

लवकरच लाँच होतोय Realme 15 Pro 5G स्मार्टफोन; ब्रँड कॅमेरा, दमदार AI फीचर्स अन् किंमत फक्त..

Rupee Symbol: रुपयाचं चिन्ह कोणी डिझाइन केलं? दोन आर्किटेक्टची कहाणी; एकाला प्रसिद्धी मिळाली, तर दुसरा...

Save Battery Phone: तुमच्या स्मार्टफोनच्या 'या' सेटिंग्ज बदलून बॅटरी अन् डेटा कसा वाचवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप पद्धत

SCROLL FOR NEXT