जळगाव

जळगावात मास्क वापरत नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई 

सचिन जोशी

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन अलर्ट झाले असून, महापालिका व पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने १५४ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला. 

जिल्ह्यात व विशेषत: जळगाव शहरात पंधरा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विवाह सोहळे व अन्य समारंभांमुळे कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यासाठी प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून बैठका घेत कठोर उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. 

त्यानुसार महापालिकेच्या पथकाने आज टॉवर चौक, शनिपेठ, बळिरामपेठ, फुले मार्केट व अन्य काही ठिकाणी पोलिस विभागाच्या मदतीने तपासणी केली. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. मास्क नसलेल्या १५४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये असा एकूण ७७ हजारांचा दंड वसूल केला. 

हॉकर्सवरही कारवाई 
या तपासणीदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हॉकर्सच्या अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली. रस्त्यात गाडी लावणाऱ्या हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. आता ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी त्याबाबत काळजी घ्यावी व सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT