जळगाव

जिल्ह्यात पुन्हा १५ कोरोना बाधित रुग्णांचा बळी 

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येने पुन्हा दोनअंकी आकडा गाठला. १५ रुग्णांच्या बळीने एकूण बळींची संख्याही साडेसातशेवर पोचली. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी प्राप्त अहवालात बरे झालेले रुग्ण ६१७, तर नव्याने बाधितांची संख्या ६०४ होती. 


जळगाव जिल्ह्यात दररोज पाच-सहाशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून, मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात नव्याने ६०४ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण बाधितांचा आकडा २३ हजार ५२७ झाला. सोबतच ६१७ जणांना मंगळवारी डिस्चार्ज दिल्यानंतर बरे झालेल्यांची संख्याही १६ हजार ५९९ झाली आहे. गेल्या २४ तासांतील १५ मृत्यूंमुळे एकूण बळींचा आकडा ७५२ झाला असून, सर्वाधिक रुग्ण आणि बळीही जळगाव शहरातील आहेत. शहरातील रुग्णसंख्या पाच हजार ३५४ झाली असून, मृत्यूही १४९ वर पोचले आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ११६, जळगाव ग्रामीण ६१, भुसावळ ५४, अमळनेर ६१, चोपडा ६३, पाचोरा ४३, भडगाव १९, धरणगाव ४१, यावल १३, एरंडोल २३, जामनेर ३०, रावेर २२, पारोळा १८, चाळीसगाव २०, मुक्ताईनगर १४, बोदवड २, इतर जिल्ह्यातील ४. 

धरणगाव बाराशेच्या उंबरठ्यावर 
धरणगाव : तालुक्यात या महिन्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली असून, बाराशेच्या उंबरठ्यावर पोचली आहे. तालुक्यात १६ मे ते जुलैअखेर अडीच महिन्यांत ५०६ रुग्ण होते, ऑगस्टमध्ये २५ दिवसांत ६१५ रुग्ण वाढले आहेत. आता रुग्णसंख्या एक हजार १२१ आहे. यांपैकी ८५५ रुग्ण बरे झाले आहेत, तर २२९ उपचार घेत आहेत. ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. 

दोन कुटुंबांत दहा पॉझिटिव्ह 
पहूर (ता. जामनेर) : पहूर कसबे येथे मंगळवारी दोन कुटुंबांतील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पहूर गावाची वाटचाल द्विशतकाकडे सुरू असून, काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT