जळगाव

कोरोनाग्रस्तांशी मोबाईलद्वारे आता नातेवाईक साधू शकतात संवाद   

देविदास वाणी

जळगाव  ः जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना भेटता येत नाही किंवा संवाद साधता येत नाही. यामुळे नातेवाइकांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयात सुविधा कशा मिळत असतील, याची शंका असते. आता सेवेबाबतची शंका दूर होणार आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांशी त्यांच्या नातेवाइकांना थेट संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांनी दिली. 

संबधित बातम्या : जळगाव जिल्ह्यातील कोविड सेंटरवर २४ तास ‘वॉच’;कसा तर वाचा !  

रुग्णांना विविध वॉर्डांत उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णांशी संवाद साधावयाचा असेल, त्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील ‘वॉररूम’ कक्षात संपर्क करावयाचा आहे किंवा स्वतः येऊन भेटायचे आहे. रुग्णाचे नाव व वॉर्डाचे नाव सांगितल्यास तेथील व्यक्ती नातेवाइकांचा आतील रुग्णांशी संवाद साधून देतील, अशी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डातील रुग्णांशी संवाद साधण्याची वेळ ठरवून दिली आहे. यामुळे नातेवाईक आता ‘वॉररूम’मधून रुग्णांशी संपर्क साधून संवाद साधू शकतात. सोबतच व्हिडिओ कॉलद्वारेही पाहू शकतात. आत मिळणाऱ्या सुविधा, नाश्‍ता, पाणी याची चौकशी करू शकतात. यामुळे नातेवाइकांना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती मिळतेच. सोबतच ते समाधानी असतात. डॉक्टरांशीही संवाद साधून रुग्णांशी तब्येतीची विचारपूस करू शकतात.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT