Orphan 
जळगाव

अनाथ बालकांना मदतीचा केवळ फार्स

Jalgaon Orphaned Children : जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात जळगाव तालुक्यातील काही सज्ञान अनाथ बालकांनी महिन्यापूर्वी संपर्क साधला

देविदास वाणी

जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने तसे केलेले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २७५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


जळगाव : कोरोनामुळे (corona) अनाथ झालेल्या बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) दोन महिन्यांपासून देत आहेत. प्रत्यक्षात अनाथ झालेल्या किंवा एक पालक गमाविलेल्यांच्या पदरी एक दमडीही आलेली नाही. यावरून जिल्हा प्रशासन कोरोनामुळे अनाथ (Orphan) झालेल्यांना मदतीचा केवळ फार्स करीत नाही ना, अशी म्हणण्याची वेळ कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांवर आली आहे.


मे- जून महिन्यात केंद्र व राज्य शासनानेही कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा, त्याचे समुपदेश करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या बालकांचे जीवनमान चांगले राहील.

आदेश होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सुरूच आहे. आतापर्यंत जे आढळले, ज्यांनी कागदपत्रे आणून दिली किंवा यंत्रणेने जमा केली असेल, त्यांना तर मदत देणे अपेक्षित होते. नंतर जे येतील त्यांची कागदपत्रे जमा करून नंतर त्यांना मदत दिली जावी. जेणेकरून आताच जे आर्थिक अडचणीत आहेत, त्यांना मदत होईल. मात्र, जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने तसे केलेले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २७५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बालक मदतीसाठी संपर्क साधतील, तेव्हा मदतीची प्रक्रिया करू, असे करायला नको, असे कोरानाने अनाथ मात्र सज्ञान बालकांना वाटते.


उडवाउडवीची उत्तरे
जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात जळगाव तालुक्यातील काही सज्ञान अनाथ बालकांनी महिन्यापूर्वी संपर्क साधला असता, त्यांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. तीन- चार दिवसांनी घरी येऊ असे सांगितले. अद्यापही कार्यालयाचे पथक माहिती घेण्यासाठी गेलेले नाही. पुन्हा संपर्क केला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे सांगण्यात आले.


जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-अनाथ झालेल्या बालकांना दरमहा एक हजार १०० रुपये द्यावेत
-बालकांचे शिक्षण थांबू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात
-कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक मदत करावी


कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांचे आपल्या पातळीवरील काम पूर्ण झाले आहे. ३०० अनाथ बालकांना सहा महिन्यांसाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी शासनाकडे केली आहे. ते अनुदान आले, की मदत देवू.
-विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT