corona positive women dilevary
corona positive women dilevary 
जळगाव

चांगली बातमी : कोरोनाबाधित महिलांनी दिला गोंडस बाळांना जन्म 

सचिन जोशी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात दाखल दोघा कोरोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती झाली. दोघांनी दोन गोंडस बाळांना जन्म दिला आहे. या बाळांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. 


बाळाच्या मानेभोवती होते वेढे 
एक महिला तांबापुरा येथील रहिवासी असून, १ जुलैस तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. बुधवारी दुपारी महिलेस तीव्र कळा जाणवायला लागल्या. याबाबत स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांना माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने दाखल झाले व या महिलेची नॉर्मल प्रसूती केली. बाळाच्या मानेभोवती नाळेचे दोन वेढे होते, ते यशस्वीपणे काढण्यात आले व बाळाला बालरोग तज्ज्ञाकडे दाखल करण्यात आले. 

‘क्विक इन क्विक आउट’द्वारे सीझर
दुसऱ्या एका केसमध्ये निमखेडी येथील रहिवासी महिला ४ जुलैस दाखल झाली होती. गुरुवारी (ता. ९) दुपारी या महिलेस तीव्र कळा जाणवायला लागल्या. बाळाचे वजनही जास्त होते. त्यामुळे महिलेचे सीझर करणे गरजेचे होते. तसा निर्णय डॉ. बनसोडे यांनी घेतला व ‘क्विक इन क्विक आउट’ या प्रणालीद्वारे यशस्वीपणे सीझर केले. या बाळाच्या मानेभोवतीही नाळेचे तीन वेढे होते, ते काढण्यात आले. बाळास बालरोग तज्ज्ञाकडे दाखल केले आहे. दोन्ही बाळांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. सद्य:स्थितीत दोन्ही माता व बाळांची प्रकृती स्थिर आहे. 

 
दोन्ही कोरोनाबाधित महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. बाळांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचारही सुरू आहेत. आमच्या टीमचे त्याबद्दल अभिनंदन. 
-डॉ. संजय बनसोडे, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT