stop corona sakal
जळगाव

जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना महामारीला (Coronavirus) रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील एक हजार १५७ ग्रामपंचायतींपैकी एक हजार १७९ ग्रामपंचायती कोरोनामुक्त (Corona free village) झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे या गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात (Jalgaon district corona free village abhiyan) जिल्ह्यातील चार सरपंचांशी सोमवारी (ता. ७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. (Corona-was-stopped-66-villages-in-jalgaon-district)

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा (Jalgaon coronavirus) उद्रेक झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शिरकाव होऊन कोरोनाने कहरच माजविला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मीच माझा रक्षक, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माध्यमातून कोरोनामुक्त गावाचा संदेश दिला होता. त्या दृष्टिकोनातून ग्रामपातळीवर कोरोना कमिटी तयार करण्यात येऊन गावाचा सरपंच अध्यक्ष, पोलिसपाटील सचिव, ग्रामसेवक यांच्या खांद्यावर गावाची धुरा सोपविली होती.

१ हजार ९४ ग्रामपंचायती कोरोनामुक्‍त

जळगाव जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल एक हजार ९४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याचा विचार केला केला तर जिल्ह्यात एक हजार १५७ ग्रामपंचायतींपैकी एक हजार ९४ ग्रामपंचायती मागील काळात कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव केलेल्या गावात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, डॉ. गणेश पांढरे, डॉ. बाळासाहेब वाबळे, ग्रामपातळीवर डॉक्टर, नर्स, अंगणवाडीसेविका यांच्यासह कोरोनायोद्धे आदींनी विविध उपाययोजना करून कोरोनाची साखळी तोडण्यास मोलाची साथ दिली आहे.

विजेत्या गावांना ५० लाखांचे बक्षिसे

कोरोनामुक्त ग्रावांना चालना देण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाची घोषणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडलेल्या कोरोनामुक्त गाव मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे. या र्स्धेतील विजेत्या गावांना ५० लाखांची १५ घसघशीत बक्षिसे देण्यात येणार आहेत. दरम्यान, ग्रामपातळीवरील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांच्यामार्फत आपले कुटुंब, आपली जबाबदारी हा उपक्रम राबवीत गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यासोबतच ज्या गावात कोरोनाबाधित रुग्ण होते त्या ग्रामपंचायतीने मास्कवाटप, सॅनिटायझर वाटप, गावागावांत फवारणी, स्वॅब तपासणी शिबिरे, तसेच लसीकरण शिबिरे आदी उपाययोजनांमुळे गावाला कोरोनामुक्त केले आहे.

या सरपंचांशी मुख्यमंत्री साधतील संवाद

सारोळा खुर्द (ता. पाचोरा) सीमा पाटील, विरावडे (मालापूर) (ता. चोपडा) येथील विशाल म्हाळके, मालोद (ता .यावल) येथील हसीना सिराज तडवी, पहूरपेठ (ता. जामनेर) येथील नीता पाटील यांच्याशी सोमवारी (ता. ७) दुपारी तीनला जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री ठाकरे संवाद साधून कोरोनाविषयक केलेल्या कामांची माहिती घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT