जळगाव

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज; कोविडच्या बालकांसाठी वेगळा विभाग

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : परिचारिकांना प्रशिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे. कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट आलीतरी जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालय सज्ज आहे. विशेषतः बालरोग विभाग हा उत्तमरित्या सेवा देऊन राज्यात सर्वोत्कृष्ट ठरणार असा विश्वास अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला. (jalgaon-coronavirus-civil-hospital-and-medical-collage-ready)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागातर्फे कोरोना महामारीच्या संभाव्य पुढील लाटेत लहान मुलांना असणारा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा म्हणून परिचारिका संवर्गाचे तीन दिवसीय प्रशिक्षण आज झाले. त्यावेळी डॉ. रामानंद बोलत होते. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे उपस्थित होते. शिबिरांमध्ये ३०० परिचारिका व परिचर्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. विश्वा भक्ता, डॉ. नीलांजना गोयल यांनी काम पाहिले. अधिपरिचारिका संगीता शिंदे, सौ.नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बालरोग विभागात उत्‍तम सेवा देऊ

डॉ. रामानंद म्हणाले की, प्रशिक्षण घेतल्यास आपण परिपूर्ण होतो. लहान बालकांवर उपचार करणे म्हणजे नाजूक गोष्ट असते. यावेळी आपण परिचारिका संवर्गातील घटक जर बालरोग विभागामध्ये उत्तम सेवा देऊ तर निश्चितच नातेवाईकांची मन जिंकू. लहान बालके पूर्ण बरी होऊन घरी गेली पाहिजे, यासाठी स्वतःला अद्ययावत ठेवावे.

यावरही झाली चर्चा

डॉ. अतुल गाजरे यांनी कोरोनाची लक्षणे कशी ओळखावी, त्याची तपासणी याविषयी माहिती दिली. डॉ. गिरीश राणे यांनी एक महिना ते बारा वर्षे वयोगटाच्या बालकांना उपचारपद्धती कोणती व कशी वापरावी, त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करावे, रुग्ण व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. संपत मलाड यांनी औषध कधी व कसे द्यावेत, त्याची हाताळणी कशी करावी, डॉ. शिव जनकवाडे यांनी ऑक्सीजन कसा लावावा व मुलांचा श्वास कमी जास्त होत असल्याबाबत माहिती दिली. डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी कोविड पश्चात होणारा आजार "मिस- सी", त्याची लक्षणे, त्याची तपासणी व प्राथमिक उपचार याबाबत सांगितले. नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या डॉ. वृषाली सरोदे यांनी ० ते १ महिना वयोगटाच्या नवजात शिशुन्ना कसे हाताळावे, त्यांच्याकडे कसे लक्ष ठेवावे, कोणत्या पद्धतीने उपचार करावेत याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT