corona update
corona update 
जळगाव

corona update जळगाव जिल्ह्यात आजपर्यंतची विक्रमी रुग्णसंख्या 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या शुक्रवारी आढळून आली. दिवसभरात तब्बल ४८७ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १३ हजार ५७४ झाली आहे. सर्वाधिक ९९ रुग्ण जळगाव शहरात आढळून आले असून एरंडोललाही ७९ नवे बाधित समोर आल्याने तेथील उद्रेक समोर येत आहे. तर दिवसभरात १९९ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. 
जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्येत दररोज तीन-चारशेच्या संख्येत वाढ होत आहे. चार दिवसांपासून रोज तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असताना शुक्रवारी तब्बल ४८७ रुग्ण समोर आले. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. मुक्ताईनगर वगळता आज सर्वच तालुक्यात रुग्ण आढळून आले. आजअखेर जिल्ह्यात तब्बल १३ हजार ५७४ रुग्ण झाले असून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ९ हजार ३४४ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९२ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ५० पेक्षा अधिक होते. 
 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ९९, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ २३, अमळनेर ३२, चोपडा ४५, भडगाव ४३, धरणगाव १७, यावल ९, एरंडोल ७९, जामनेर २८, रावेर ६, पारोळा ३४, चाळीसगाव २६, बोदवड ४. 
 
धरणगाव : तालुक्यात तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. गुरुवारी एका दिवसात ४६ रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १७ रुग्ण आढळले. तीन दिवसात ७८ रुग्ण वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ६३१ झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील ४६१ रुग्ण बरे झाले, ३३ मृत झाले तर १३७ उपचार घेत आहेत. 
 
पहूरमधील दोघांचा मृत्यू 
पहूर, ता. जामनेर : पहूर कसबे येथील ५० वर्षीय गृहस्थाचा जळगाव येथे कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच लोंढ्री येथेही एका वृद्धाचा मृत्यू झाला. पहूर येथील लेले नगरात राहणाऱ्या गृहस्थास जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनावर मात करून घरी आलेल्या लोंढ्री येथील वृद्धाचाही आज मृत्यू झाला . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT