janta curfew
janta curfew 
जळगाव

जळगाव शहरात सोमवारपासून जनता कर्फ्यू...असे ठरले नियम प्रभागानुसार

देविदास वाणी

जळगाव : महापालिका क्षेत्रात येत्या सोमवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. आठवडाभर प्रत्येक दिवशी तीन प्रभागांचा त्यात समावेश असेल. कर्फ्यू नागरिकांनी स्वतः पाळावयाचा आहे. कर्फ्यू जाहीर करण्यात आलेल्या प्रभागात केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील. अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

 हेही पहा - केस कापण्यासाठी जाताय; मग अगोदर हे पहा...सलुन व्यावसायिकांनी घेतलाय हा निर्णय

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महापालिका क्षेत्रासह भुसावळ, अमळनेला ७ ते १३ जुलै दरम्यान लोकल लॉकडाउन पाळण्यात आला. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद आला. आता येत्या सोमवारपासून (ता.२०) शहरातील विविध ठिकाणची व्यापारी संकुले सुरू करून दुकानदारांना मालाची केवळ घरपोच डिलीव्हरी देता येणार आहे. तीही १२ ते ४ या वेळेतच. नागरिकांना व्यापारी संकुलात माल खरेदीसाठी जाता येणार नाही. 
नागरिकांची शहरातील गर्दी कमी व्हावी, जेणे करून कोरोना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासन घेत आहे. यामुळेच येत्या सोमवारपासून दर दिवशी तिन प्रभागात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. 

खालील भागात पाळला जाईल जनता कर्फ्यू 

सोमवार (२० जुलै) : प्रभाग १, २, ३- शिवाजीनगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर, इंद्रप्रस्थ नगर, गेंदालाल मिल, वाल्मीकनगर असोदा रोड, कांचननगर, सदाशिव नगर आदी परिसर. 

मंगळवार (२१ जुलै) : प्रभाग ४, ५, ६- शनिपेठ, रिधूरवाडा, जोशीपेठ, ओंकारनगर, जयसिकनवाडी, तायडे गल्ली, विसनजी नगर, अजिंठा चौफुली, जिल्हापेठ, ओंकारनगर, नशिराबाद रोड, कालिकामाता मंदिर परिसर नगर. 

बुधवार (२२ जुलै) : प्रभाग ७, ८, ९- यशवंत कॉलनी, रिंगरोड, शिक्षकवाडी, एलआयसी कॉलनी, शिवकॉलनी, जिवरामनगर, भोईटेनगर, दादावाडी, शंकरअप्पा नगर, हायवेदर्शन कॉलनी, पिंप्राळा आदी परिसर. 

गुरुवार (२३ जुलै) : प्रभाग १०, ११, १२- दांडेकरनगर, पिंप्राळा, ख्वाजानगर, हुडको, हरिविठ्ठलनगर, बाजारपट्टा, कोल्हेनगर, महाबळ परिसर, मकरंद कॉलनी, पार्वतीनगर, रामानंद नगर, प्रभाग कॉलनी, जयनगर आदी. 

शुक्रवार (२४ जुलै) : प्रभाग १३, १४, १५- मोहनगर, आदर्शनगर, नेहरू नगर, मोहाडी रोड, लक्ष्मीनगर मेहरूण, आदर्श नगर, मोहमद्दियानगर, जोशी वाडा, ज्ञानेश्‍वर चौक आदी. 

शनिवार (२५ जुलै) : प्रभाग १६, १७- सिंधी कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, गणेश नगर, अशोक नगर, औदोगीक नगर आदी 
रविवार (२६ जुलै) : प्रभाग १८, १९- अक्सानगर, गणेशपूरी, रामेश्‍वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी आदी परिसर.
 


संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT