corona dead 
जळगाव

धक्‍कादायक...‘निगेटिव्ह’ सांगत दिला डिस्चार्ज; महिला घरी पोहचली आणि 

राजेश सोनवणे

जळगाव : कोरोनाची लक्षणे असलेल्या महिलेचा अहवाल ‘निगेटिव्ह’ असल्याचे सांगत शासकीय रुग्णालयातून तिला घरी पाठविण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या महिलेचा खासगी रुग्णालयात केलेल्या चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ असतानाही तिच्याबाबत हा प्रकार घडला. 


या प्रकारामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. कुसुंबा (ता. जळगाव) येथील महिलेस कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती सुधारत नसल्याने तिला जळगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे या महिलेची ॲन्टीजेन चाचणी केल्यानंतर ती कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यामुळे महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात ११ सप्टेंबरला दाखल करण्यात आले. 

‘निगेटिव्ह’ सांगून पाठविले घरी 
या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याने महिलेची तपासणी करून ती ‘निगेटिव्ह’ असल्याचे सांगत तिला घरी पाठविले. या महिलेस केवळ घशाचा त्रास असून ग्लुकोजचे पाणी द्या, बरे वाटेल, असेही सांगण्यात आले. या महिलेस आज श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर तिला कोविड रुग्णालयात दाखल केले असता, संबंधितांनी तिला ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे सांगितले आणि नंतर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या नातलगांचा संताप होऊन त्यांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महिलेचा मुलगा माधव खरोटे यांनी केली आहे. 
 
बेड नसल्याने पाठविले परत? 
आज पुन्हा या महिलेस दाखल केले असता, तिला ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे सांगण्यात आले. मात्र, परवा का घरी पाठविले, असे विचारले असता संबंधितांनी बेड नसल्यामुळे परत पाठविल्याचे सांगण्यात आले, असेही या महिलेच्या मुलाने बोलताना सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thank You India! लिहीत इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला, कठोर निर्णयामागचं नेमकं कारण काय?

जाऊ द्या ना काका... ! तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवले? Video Viral

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी ओटीटी’चा खास नजराणा! ७५ हून अधिक गाजलेली नाटकं घरबसल्या पाहा

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

SCROLL FOR NEXT