orphan children
orphan children orphan children
जळगाव

'कोविड’मुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार दरमहा मदत

देविदास वाणी



जळगाव ः राज्यात कोरोनामुळे (corona) दोन्ही पालक (parents death) गमाल्याने अनेक बालक अनाथ (Child orphan) झाले आहे. त्यामुळे अशा बालकांना मदत म्हणून शासनाकडून १ हजार १०० रुपये दरमहा दिली जाते. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात (Jalgaon collector Office) बैठक घेण्यात आली. या बैठकी ही मदत या बालकांना मिळण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करुन त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम तातडीने करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी आज दिले. ( covid orphan children help collector department instruction)

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए ए के शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, आरिफ शेख, वैजयंती तळेले, योगेश मुकावार, भानूदास येवलेकर आदी उपस्थित होते.

HELP

अशा दिल्या सुचना..

जिल्हाधिकारी म्हणाले की, पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ११०० रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र बालकांना तातडीने मिळाला पाहिजे. या बालकांचे शिक्षण थांबता कामा नये. या बालकांचे वारसाहक्क अबाधित राहतील यासाठी त्यांना आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे. या बालकांना शासनामार्फत मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्यासाठी बॅंकांनी मदत करावी. या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करावी सचिव शेख यांनी सांगितले, की या बालकांना कायदेशीर मार्गदर्शन मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल.


अशी आहे आकडेवारी..
* जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेले बालक --१३
* एक पालक गमावलेल्या बालके--४०३
* बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेले बालके-- ६२
* पालकांना दिलेली अनाथ बालके---१३
* कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला-- १८४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT