disha meeting
disha meeting 
जळगाव

‘दिशा’समितीची बैठक;शेतकऱ्यांची वीज कापल्याने लोकप्रतिनिधी संतप्त

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन न कापण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिले असतानाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे (Farmer) विजेचे, पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन महावितरणने (MSEDCL) कापल्याने खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse), खासदार उन्मेष पाटील(MP Unmesh Patil), आमदार शिरीष चौधरी(MLA Shirish Chaudhary), आमदार चिमणराव पाटलांसह (MLA Chimanrao Patil) नगराध्यक्ष, पं. स. सभापतींनी मंगळवारी झालेल्या ‘दिशा’ समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केला.


येथील नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ डॉ. पंकज आशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका मिनल कुटे उपस्थित होत्या. राज्य शासनाचे अधिकारी केंद्र शासनाचे आदेश दाखविता, केंद्राचे कर्मचारी राज्याचे आदेश दाखवितात. मंत्री आदेश देतात तर त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शेलवड (ता. बोदवड) येथे एका शेतकऱ्याच्या शेतात विजेचे पोल नाही, मीटर नाही तरी त्याला वीज कंपनीने बिल पाठविल्याची तक्रार करण्यात आली.

‘बीएसएनएल’ अधिकाऱ्यांकडे माहितीच नाही

केंद्र शासन ‘बीएसएनएल’ विभाग चालविते. मात्र जिल्ह्यात, बीएसएनल विभागाचे किती कनेक्शन आहेत, नागरिकांना कनेक्शन मिळत नाही, बिल भरण्यास बीएसएनएलमध्ये गेले असता कर्मचारी नसतात, आदी तक्रारी होत्या. त्यावर बीएसएनएलच्या महाव्यवस्थापकांना काहीही माहिती देता आली नाही. यामुळे त्यांच्यावरही लोकप्रतिनिधींची संताप व्यक्त केला. यापुढे दिशा बैठकीस येताना सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती आणावी अशा सूचना देण्यात आले.

तुम्ही शासनाचे की कंत्राटदाराचे ते सांगा...

तरसोद- फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अडीच वर्षापासून सुरू आहे. ते केवळ ४५ टक्के झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरण लवकर होणे अपेक्षीत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी कसे घालतात ? तुम्ही कंत्राटदाराकडून पगार घेता की शासनाकडून ? असा संताप खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला. महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. कंत्राटदार फसवे आहे असे माहित असतानाही संबंधितांना काळ्या यादीत का टाकत नाही ? आगामी आठ दिवसात काम प्रगतिपथावर न दिसल्यास तुमची बदली करू असा इशाराच यावेळी देण्यात आला. त्यावर महामार्गाचे अधिकारी सिन्हा यांनी आगामी सहा महिन्यात तरसोद- फागणे काम बरेच झालेले असेल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT