corona corona
जळगाव

भुसावळ, मुक्ताईनगर ठरतांय कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

८४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार १५५वर पोचला.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव : शहरासह चोपडा (chopda), अमळनेर (amalner) तालुक्यात काही प्रमाणात संसर्ग नियंत्रणात (Infection control) येत असला तरी आता कोरोनाचा (corona) विळखा मुक्ताईनगर (mukatainager) , भुसावळ (bhusawal) तालुक्यात घट्ट होताना दिसतोय. जिल्ह्यात दिवसभरात ११ मृत्यू (death) झाले तर नव्या बाधितांएवढेच बरे होणाऱ्यांचीही नोंद झाली.


( jalgaon distict bhusawal muktainagar 'hotspot' corona)

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून आणि विशेषत: मे महिना सुरु झाल्यापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. बुधवारी दिवसभरात ७ हजार ४२१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४९ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार ४२३ झाली आहे. तर ८४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार १५५वर पोचला.

बळींचा आकडा झाला कमी
गेल्या तीन-चार दिवसांपासून दररोजच्या बळींचा आकडाही कमी होत आहे. तीन दिवसांपासून मृत्युसंख्या १५च्या आत असून बुधवारीही केवळ ११ मृत्यू झाले. एकूण बळींचा आकडा २३७४ झाला आहे. सारी, कोविड निगेटिव्ह, न्युमोनिया, कोरोना संशयित आदींमुळे ८ मृत्यू झालेत.

जळगावात दिलासा
जळगाव शहरातील नवीन रुग्णसंख्या तीन दिवसांपासून शंभराच्या आत आढळून येत आहे. बुधवारीही शहरात ८६ रुग्ण आढळले तर १६२ रुग्ण बरे झाले.
अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण : जळगाव ग्रामीण २२, भुसावळ १६३, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा १५, भडगाव ८, धरणगाव १५, यावल २५, एरंडोल २२, जामनेर ६१, रावेर ५२, पारोळा १६, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर १७१, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यातील २६.


( jalgaon distict bhusawal muktainagar 'hotspot' corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT