Gas cylinder explosion 
जळगाव

रावेरः ऐनपूरची दसऱ्याची पहाट..गॅस सिलेंडर स्फोटाने हादरली

गॅसचा भडका होताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले.

सकाळ वृत्तसेवा

रावेर ः ऐन दसऱ्याच्या (Dasara) दिवशी सकाळी चहा करत असताना तालुक्यातील ऐनपूर येथील एका शेतमजूर कुटुंबाच्या (Agricultural family) घरातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट (Gas cylinder explosion) होऊन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरीही ऐन दसऱ्याच्या दिवशी कुटुंब उघड्यावर आले आहे आणि घरात पिण्यासाठी पाणीही नाही अशी कुटुंबाची स्थिती झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ऐनपुर येथील बारी घाट परिसरात राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्‍नाथ बारी ( वय ६६ वर्षे) या मोलमजुरी करणाऱ्या महिला आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह राहतात. आज ( ता १५) सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसवर चहा करत असताना अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. गॅसचा भडका होताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले. या आगीने रौद्र रूप धारण केले आणि नंतर झालेल्या स्फोटात पत्र्याचे घर आणि घरातील सर्व सामान अक्षरश: उध्वस्त झाले.

सिलेंडरचे दोन तुकडे

हा स्फोट इतका भयानक होता की, गॅस सिलेंडरचे दोन तुकडे झाले. या घराच्या विटांचे आणि मातीचे तुकडे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले आणि घरावरील पत्रे, लोखंडी कपाट,संसारोपयोगी साहित्य आगीत जळून नष्ट झाले.

कुटूंबीयाची गरीब परिस्थीती..

बारी परिवार अतिशय गरीब असून मोलमजुरी करणारा आहे. सुशीला बाईचा मुलगाही भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. आता ऐन दसऱ्याच्या दिवशी घरात पिण्यासाठीही पाणी नाही. घरातील संसारोपयोगी सामान लोखंडी कपाट अंथरूण-पांघरूण सर्व जळून नष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT