Rain 
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन;शेतकऱ्यामध्ये आनंद

Jalgaon Rain News : पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नसल्याने खानदेशावर दुष्काळाचे सावट आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात जुलैअखेर पडलेल्या पावसाने अन्य भागात पुराचे थैमान घातलेले असताना खानदेश व पर्यायाने जळगाव जिल्हा कोरडाच होता.

जळगाव : पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यासह खानदेशावर अवकृपा करणाऱ्या वरुणराजाने मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. तीन आठवड्यांचा खंड पडल्यानंतर पाऊस आल्याने पिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या दोन-तीन आठवड्यांमध्ये उडीद, मुगाच्या पिकांचे मात्र व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे.


राज्यात जुलैअखेर पडलेल्या पावसाने अन्य भागात पुराचे थैमान घातलेले असताना खानदेश व पर्यायाने जळगाव जिल्हा कोरडाच होता. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नसल्याने खानदेशावर दुष्काळाचे सावट आहे. दुबार पेरणी कशीबशी वाचलेली असताना पावसाने पुन्हा तीन आठवडे ओढ दिली. त्यामुळे उडीद, मुगाचे पीक जवळपास हातचे गेले. अन्य पिकांची आस या पावसावर होती. सोमवारी काही भागात पाऊस झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या थोड्या पावसाने पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे.

Rain

अमळनेर तालुक्यात पाऊस

यावर्षी खरीप हंगामात तब्बल दोन महिन्यात प्रथमच अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला.गेल्या जून ,जुलै या दोन महिन्यात शेतशिवारात साधे डबके ही भरले नव्हते.आँगस्टच्या अर्धा महिना उलटला खरीप हंगामाची आशा मावळली.मात्र पिण्याच्या पाण्याचा आणि गुरांचा चाराचा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला होता. आज ता.17 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळमसरे ,मारवड परिसरात पावसाला सुरुवात झाली.यानंतर अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

Rain

खरीप हुकला आता रब्बीची आशा

तालुक्यात सर्वत्र दोनदा पेरणी ,कापूस लागवड होऊनही अडीच महिने पाऊस नसल्याने शेतकरी बांधवाच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे.सदस्यस्थितीत गुरांना चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सह पशुपालक यांचे मात्र हाल होत आहेत.आज झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची आशा पल्लवित झाल्या असून असाच पाऊस होत राहिल्यास चाराची समस्या मिटेल असेही मत यावेळी शेतकरी बांधवानी व्यक्त केले.

जोरदार पावसाची आवश्यकता

तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई भेडसावू लागली आहे.यामुळे असेच तीन चार पाऊस झाल्यास पिण्याच्या पाणीचा प्रश्न सुटेल.तर खरीप हातातून गेल्याने रब्बीची आशा पल्लवित झाल्याने चिंतातुर झालेला शेतकरी राजा खरीप हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून वाया गेल्यावरही आज दुपारी अडीच महिन्यांनी पावसाने हजेरी लावल्याने सुखावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT