Rohini khadse-Ravindra Patil
Rohini khadse-Ravindra Patil 
जळगाव

अ‍ॅड.पाटील हे जेष्ठ संचालक त्यांचा राजीनामा नामंजूर-रोहिणी खडसे

सकाळ डिजिटल टीम

सावदा: जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याला (Shri Sant Muktai Sahakari Sugar Factory) दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीने (ED) 'लेटर बॉम्ब' टाकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Jalgaon District Central Co-operative Bank) एकच खळबळ उडाली. ईडीच्या पत्राची चर्चा थांबत नाही तोच बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.रवींद्र पाटील (Senior Director Adv. Ravindra Patil) यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा (Resigned) दिला. त्यामुळे जिल्हा बँक पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आली. बँकेतील 'राजकारण' तापल्याने नाराज झालेले अ‍ॅड. पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली.

बँकेचे ज्येष्ठ संचालक असलेले अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत. जिल्हा बँकेने मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताई संस्थानला दिलेल्या कर्जाच्या सेटलमेंटच्या विषयाबाबत बँकेकडून कार्यवाही होत नसल्याने अ‍ॅड.पाटील हे नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. एकीकडे ईडीने जिल्हा बँकेला मुक्ताईनगर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या विषयाबाबत नोटीस बजावलेली असतानाच दुसरीकडे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दोघी नेते व्यासपीठावर एकत्र..
अश्या पार्श्वभूमीवर बँकेच्या अध्यक्षा अड.रोहिणी खडसे आणि अॅड.रवींद्र पाटील हे दोघे नेते येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले असता दोघांना पत्रकारांनी प्रश्न विचारले सुरुवातीस दोघे बोलण्यास तयार नव्हते. पण पत्रकारांनी आग्रह धरल्याने दोघे बोलते झाले. यावेळी संचालक पदाचा राजीनामा दिलेले अॅड.पाटील म्हणाले मी दिलेल्या राजीनाम्यात कोणतेही राजकारण नाही. काही अडी अडचणी असतील तर त्याबाबत नाथाभाऊ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. मुक्ताई संस्थांच्या कर्ज फेडी बाबतीत वन टाईम सेटलमेंटचा विषय हा सन २०२० पासून आहे.या बाबतीत कायदेशीर बाबींचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल असे म्हणाले. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की रवींद्र पाटील हे बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जेष्ठ संचालक,पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना बॅक कारभाराचा अनुभव आहे. आम्ही एकाच राजकीय परिवारातील आहोत कोणताही वाद नाही.

राजीनामा नामंजूर केला
अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा विषया संदर्भात माहिती देताना अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सांगितले की,मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजानामा दिला आहे तर जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणी खडसे यांनी राजीनामा नामंजुर केला असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT