Curfew Curfew
जळगाव

जळगाव जिल्ह्यात संचारबंदीची ‘ऐशीतैशी’

एवढी गर्दी येथे असते की शहरात विविध ठिकाणी नागरिक मनसोक्त फिरत असतात.

देविदास वाणी



जळगाव ः जिल्ह्यात सात जूनपासून कोरोना (corona) निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले. नंतर मात्र गेल्या सोमवारपासून (ता.२८ जून) सायंकाळी पाच ते पहाटे पाच अशी संचार बंदी (Curfew) जाहीर करण्यात आली. मात्र जळगाव शहरातील काही भाग, जिल्हयातील ग्रामीण भाग, भुसावळ शहरात या संचारबंदीला हारताळ फासल्याचे दिसून येते. सायंकाळी सहानंतर अनावश्‍यकरित्या अनेक जण बिनधास्त फिरतात. भुसावळला तर दूपारी चारनंतरही अर्धे शटर उघडे करून करून दुकाने असल्याचे चित्र आहे. (jalgaon district citizen corona curfew rules not follow)

गेल्या सोमवारपासून अत्यावश्‍यक दुकाने वगळता सर्व प्रकारचे दुकाने सकाळी सात ते दूपारी चार पर्यंत सुरू ठेवावयाची आहेत. सायंकाळी पाच नंतर पहाटे पाचपर्यंत संचारबंदी आहे. यात अत्यावश्‍यक कारणांशिवाय कोणाला बाहेर फिरता येणार नाही. याची जबाबदारी संबंधित महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीवर आहे.

जळगाव शहरात टॉवर चौक, आकाशवाणी चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांची पोलिस तपासणी करतात. मात्र अनेक लोटगाड्यांवर फळविक्रेते कॉलन्या कॉलन्यात गर्दी जमा करून फळे विकताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या तोंडावर मास्कही नसते. कालिका माता मंदिराजवळील कोल्हे विद्यालयाजवळ भाजी विक्रेत्यांजवळ नागरिकांची गर्दी रोजच होते. पिंप्राळा गुजराल पेट्रोल पंप, समता नगर, तांबापूरा येथील चित्रही तसेच आहे. नशिराबाद गावात डेअरीवर गर्दी असते. गावात नागरिकांची ये-जा सुरूच असते.

भुसावळला जामनेररोडवरील व्यापारी संकूलातील काही दुकाने अर्धवट शटर उघडून सुरू असतात. नाहाटा महाविद्यालयासमोरील विविध खाद्य पदार्थ, लोट गाड्यावरील पदार्थाचे दुकाने सुरू असतात. विशेष म्हणजे रोज सायंकाळी येथे वाहतुकीची कोंडी होते. एवढी गर्दी येथे असते.
शहरात विविध ठिकाणी नागरिक मनसोक्त फिरत असतात. वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भुमिका घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT