corna corna
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटतोय

शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू होऊन बळींची संख्या २५७० झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात कोरोना (coron) संसर्गात दिवसेंदिवस घट होत आहे. दोन महिन्यांपासून सुरु असलेला हा ट्रेंड कायम असून शुक्रवारी नव्या ४४ रुग्णांची नोंद (Patient) झाली तर दिवसभरात १४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाला.(jalgaon district corona patient infarction low)

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांपासून नव्या रुग्णांमध्ये घट होत असून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी ५ हजार ३९४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी ४४ बाधित आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार १५१ झाली आहे. तर १४२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३८ हजार ७१३वर पोचला आहे. शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू होऊन बळींची संख्या २५७० झाली आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ८, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ११, चोपडा ३, पाचोरा १, भडगाव १, एरंडोल १, रावेर ५, पारोळा २, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर ३, बोदवड १.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT