Corona Patient Death 
जळगाव

दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही

Jalgaon Corona News : गेल्या महिनाभरापासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच नोंदली गेली.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. दैनिक नव्या रुग्णांची संख्या दोन- चार आकड्यात असताना गेल्या दीड महिन्यापासून कोरोनामुळे जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू (Corona Patient Death) झालेला नाही, ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. दुसरीकडे रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाची स्थिती सुधारत आहे. दुसऱ्या लाटेतील तीव्रतेनंतर अडीच महिन्यांपासून कोरोनाचा उतरता आलेख सुरु झाला. गेल्या महिनाभरापासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच नोंदली गेली. सक्रिय रुग्णसंख्या प्रथमच वीसच्या टप्प्यात आली.


दीड महिन्यापासून मृत्यू नाही
दैनिक रुग्णसंख्या व सक्रिय रुग्णांची घटती संख्या सकारात्मक नोंद दर्शवत असताना गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. गेल्या १६ जुलैस एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत एकही मृत्यू नोंदला गेलेला नाही.

रविवारी शून्य रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून दररोजच्या नव्या रुग्णांची संख्या पाचच्या आतच आहे. रविवारी मात्र जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात केवळ १ रुग्ण बरा झाला. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्ण केवळ २३ असून त्यापैकी १ ऑक्सिजनवर तर ५ रुग्ण आयसीयूत आहेत.

लशींचे ५६ हजारांवर डोस प्राप्त
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लशीचे एकाच दिवसात ५० हजारांहून अधिक डोस प्राप्त झाल्यानंतर रविवारी पुन्हा ५६ हजारांपेक्षा अधिक विक्रमी डोस प्राप्त झाले आहेत. त्यात ५१ हजार ९० कोविशील्ड तर ५ हजार ७० डोस कोव्हॅक्सीनचे आहेत. या प्राप्त साठ्यातून ग्रामीण भागातील लसीकरणावर अधिक भर असेल. जळगाव शहरासाठी यापैकी १५०० डोस असतील. शुक्रवारी जिल्ह्यात एकाच दिवशी ५३ हजार नागरिकांचे लसीकरण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड; वळसे पाटलांनी मांडला प्रस्ताव, शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार का?

खऱ्या अर्थाने सत्ता बदलणार! आजीच्या नाकावर टिच्चून भावनाच्या हातात येणार घराच्या चाव्या; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Mumbai Local: साध्या लोकलचे 'एसी'त रूपांतर होणार, किती असणार तिकीट? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती

Epstein Files : रशियन महिला फरशीवर झोपलेली, तिच्या अंगावर ब्रिटनच्या राजाचा भाऊ; एपस्टिन फाइल्समधील नव्या फोटोंनी खळबळ

Education News : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक बोर्ड सज्ज; सर्व केंद्रांवर आता सीसीटीव्हीची 'नजर'!

SCROLL FOR NEXT