MPSC Exam 
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी ‘एमपीएससी’ परिक्षा देणार

MPSC Exam News: परिक्षा घेण्यासाठी १ हजार १३० अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.

देविदास वाणी


जळगाव ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी) (MPSC Exam) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-२०२० (Pre-examination) येत्या शनिवारी (ता.४ सप्टेंबर) होणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत शहरातील ३५ उपकेंद्रांवर होणाऱ्या परिक्षेसाठी जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परिक्षा घेण्यासाठी १ हजार १३० अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर (Substation) परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील (Deputy Collector Rahul Patil) यांनी दिली.



परीक्षार्थीने परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणणे सक्तीचे आहे. विषयांकित परीक्षा यापुर्वी रविवार ११ एप्रिल, २०२१ रोजी घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार सदर परीक्षेचे प्रवेशासाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र प्रस्तावित ४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.



हे आहेत नियम..
- परिर्क्षीची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी होणार
- परिक्षार्थीच्या ओळखीचा पुरावा आवश्‍यक आहे.
- स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोनला बंदी
- पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर वापरास बंदी


तर स्वतंत्र व्यवस्था
ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या परिर्क्षीची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार यांनी आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT