E crop inspection 
जळगाव

ई-पीक पाहणीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

तहसीलदारांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यांतील १४ गावांमध्ये १०० टक्के ई-पीक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे.

देविदास वाणी

जळगाव ः माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, यासाठी राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून ई पीक पाहणी (E crop inspection) सुरू केली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले.


जिल्ह्यातील तहसीलदारांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यांतील १४ गावांमध्ये १०० टक्के ई-पीक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात१५ ऑगस्टपासून खातेदाराने प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यास सुरवात केली असून, तलाठ्यांच्या सक्रिय सहभागामुळे सुरवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. २८ ऑगस्टअखेर सर्व गावांमध्ये ई-पीक पाहणी ॲप पोचले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ८६७ शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे, तर ४२ हजार २८९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी भरली आहे. या कामगिरीमुळे जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे यांनी सांगितले.

शंभर टक्के ई पाहणी पूर्ण
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगायत, रामपूर येथील तलाठी अजय गवते, टाकळी खुर्दच्या दीपाली महाजन, गंगापूरच्या मीनाक्षी पडागळे, हिंगणे बुद्रुकचे फिरोज खान, चोपडा तालुक्यातील मालापूरचे सलीम तडवी, मोरचिडाचे अमीन अरमान तडवी, मुळ्यवतारचे अजय पावरा, एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे, यावल तालुक्यातील चिंचोलीचे निखिल मिसाळ, वाघोदेचे पी. एन. नेहते, वाघझिराचे टी. सी. बारेला, चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगरच्या वैशाली केकाण, विसापूरच्या वृषाली सोनवणे, धरणगाव तालुक्यातील निशाणे खुर्दचे बसवेश्वर मजगे यांनी विशेष परिश्रम घेऊन गावात १०० टक्के ई-पीक पाहणी पूर्ण केली.
ई-पीक पाहणी यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील इतर गावेही यापासून प्रेरणा घेऊन सहभाग नोंदवतील व ई-पीकपेरा स्वतः भरतील, असा आशावाद जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT