corona vaccination 
जळगाव

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ४९ हजार जणांनी घेतली लस

Jalgaon Vaccination News: जळगाव जिल्ह्यात ४४ हजार ४० कोव्हिशील्ड, तर पाच हजार ६८० कोव्हॅक्सिन अशी मात्रा उपलब्ध झाली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात लसीकरणाबाबत (covid-19 vaccine) शनिवारचा दिवस उल्लेखनीय ठरला. एकाच दिवशी ४९ हजार ३० जणांनी घेतली लस घेतल्याचा विक्रम झाला आहे. तालुकास्तरावर १३ हजार १०५, तर ग्रामीण भागात ३५ हजार ९२५ नागरिकांचे लसीकरण (corona vaccination) झाले.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विभागस्तरावरून अत्यंत मोजक्याच प्रमाणात लशींचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे; परंतु जिल्ह्यात ४४ हजार ४० कोव्हिशील्ड, तर पाच हजार ६८० कोव्हॅक्सिन अशी मात्रा उपलब्ध झाल्यानंतर शनिवारी एका दिवसात तब्बल ४९ हजार ३० जणांचे लसीकरण झाले. आतापर्यंत सर्वांत जास्त लसीकरण करण्याची विक्रमी संख्या असल्याचे दिसून आले आहे.

११ हजार २१४ नागरिकांना दुसरा डोस

शनिवारी ग्रामीण भागात २४ हजार ७११ नागरिकांना पहिला, तर आठ हजार ७३२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला, तर शहरी भागात चार हजार ७३३ नागरिकांना पहिला, तर ११ हजार २१४ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

११ लाख ९३ हजार जणांचे लसीकरण

जिल्ह्यात ग्रामीण भागात पहिला डोस चार लाख चार हजार ६०७, तर एक लाख ७७ हजार ६०९ जणांना दुसरा डोस असे एकूण पाच लाख ८२ हजार २१६ नागरिकांचे लसीकरण झाले. शहरी भागात पहिला डोस चार लाख ७८ हजार ८४१, तर एक लाख ३२ हजार ६८२ दुसरा डोस एकूण सहा लाख ११ हजार ५२३ असे एकूण ११ लाख ९३ हजार ७३९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT