Ganesh Visarjan
Ganesh Visarjan 
जळगाव

जळगाव जिल्ह्यात ११०० सार्वजनिक गणेश मंडळांतील 'श्री' आज विसर्जन

देविदास वाणी


जळगाव ः नऊ दिवसांपासून श्री गणेशोत्सव सुरू (Ganesh Utsav) आहे. विघ्नहर्त्या गणेशाला सर्वांनीच कोरोनापासून (Corona) सर्वांना मुक्ती दे, दृष्ट प्रवृत्तीपासून सर्वांचे रक्षण कर, असे साकडे घातले. आज सर्वत्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यात येणार आहे. विसर्जनाची तयारी जिल्हा व तालुका प्रशासनाने (Administration)पूर्ण केली आहे. विसर्जनस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोबतच ठिकठिकाणी पोलिस दलातर्फे (Police) ‘सीसीटीव्ही’ व्हॅन ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात सुमारे ११०० च्यावर सार्वजनिक गणेश मंडळांना निरेाप देण्यात येणार आहे.


विसर्जनामुळे वाहतूक मार्गात बदल
गणेश विसर्जनावेळी मिरवणुका काढण्यात येणार नसल्या तरी शहरातील काही मार्ग आज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात जळगाव ते पाचोरा येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील वाहनांसाठी इच्छादेवी चौक ते शिरसोली हा रस्ता बंद राहणार आहे. यामुळे या वाहनांना पाचोऱ्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, डी मार्ट, मलंगशहा बाबा दर्गा या मार्गाने जातील. जळगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी मलंगशहा बाबा दर्गा, राजे संभाजी चौक, संत गाडगेबाबा चौक, महाबळ चौक, काव्य रत्नावली चौक, आकाशवाणी चौकमार्गे जळगाव हा मार्ग असेल असे शहर वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आले.


भादली, असोद्यालाही पर्यायी मार्ग
असोदा, भादली गावाकडून जळगावकडे येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी बस, खासगी वाहने रविवारी सकाळी सहा ते रात्रीपर्यंत मोहन टॉकीज, गजानन मालुसरेनगर, जुने जळगाव, लक्ष्मीनगर, कालिकामाता मंदिरमार्गे अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, बसस्थानकावर येतील.


तुरटीच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलाशयात करू नका

शहरात तुरटीपासून निर्मित सुमारे सहा हजार गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी या मूर्ती घरीच विसर्जित करा, नदी, तलाव, विहिरीत मूर्तींचे विसर्जन करू नका, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत, त्यांनी या मूर्ती महापालिका मूर्ती संकलन केंद्रावर दान कराव्यात किंवा घरीच विसर्जन करावे, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT