corona  
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा तीसच्या आत

सध्या बोदवड तालुक्यातही स्थिती नियंत्रणात असून १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सातत्याने घटत जाणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील (Corona) सक्रिय रुग्णसंख्या घटली होती. गेल्या आठवड्यात बोदवड तालुक्यात वाढलेल्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांमध्ये (corona active Patient) वाढ झाली होती. परंतु आता रुग्ण पुन्हा कमी होऊन वीसच्या आत संख्या मर्यादित राहिली आहे.

जळगाव जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या चार- पाच पेक्षा जास्त नाही. दोन महिन्यांपासून हा ट्रेंड असल्याने सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात बोदवड तालुक्यात तीन- चार दिवसांतच नवीन दहा- बारा रुग्ण समोर आले. सध्या या तालुक्यातही स्थिती नियंत्रणात असून १२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित अन्य सर्व तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्ण एक- दोनच्या संख्येत आहेत.

बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के

जिल्हाभरात आता अवघे २६ सक्रिय रुग्ण असून पैकी २ ऑक्सिजनवर व ३ आयसीयूत आहेत. रविवारी ३ हजार २७ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत. पैकी पाचोरा १, चाळीसगाव २ व भडगाव तालुक्यात १ असे ४ रुग्ण आढळून आलेत. तर ६ रुग्ण दिवसभरात बरे झाले. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्‌या १ लाख ४२ हजार ६८२ आहे, तर बरे झालेल्यांचा आकडा १ लाख ४० हजार ८१वर पोचला आहे. बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के झाले असून हा दर राज्यातील रिकव्हरी दरापेक्षा अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT