corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्ण संख्या पंचवीसच्या आत

Jalgaon Corona Updet: सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १०४ पर्यंत घटली आहे. पैकी लक्षणे नसलेले ६८, तर लक्षणे असलेले रुग्ण ३६ आहेत.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा (corona) उतरता आलेख कायम आहे. गुरुवारी नव्या सहा रुग्णांच्या (Patient) नोंदीसह ११ रुग्ण कोरोनामुक्त (corona free) झाले. गंभीर रुग्णांची संख्या आता पंचवीसच्या आत आली असून, दोन्ही लाटांमधील हा नीचांकी आकडा आहे.

(jalgaon district is corona critical patients number in twenty five)


जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मार्च ते मे अशा दोन-अडीच महिन्यांमध्ये तीव्रतेवर होता. नंतर मात्र लाट ओसरायला सुरवात झाली आणि आता जुलैच्या अखेरीस सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या टप्प्यात येण्यापर्यंत संसर्ग नियंत्रणात आला आहे.
गुरुवारी दोन हजार ५६४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी जळगाव शहर एक, पाचोरा तीन, जामनेर व चाळीसगाव तालुका प्रत्येकी एक असे केवळ सहा नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४२ हजार ५४६ झाली आहे, तर दिवसभरात ११ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ८६७ वर पोचला आहे. गुरुवारी (ता. २२) सलग सहाव्या दिवशी जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.


गंभीर रुग्ण पंचवीसच्या आत
सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १०४ पर्यंत घटली आहे. पैकी लक्षणे नसलेले ६८, तर लक्षणे असलेले रुग्ण ३६ आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली असून, ऑक्सिजनवर १७ आणि आयसीयूतील रुग्णसंख्या अवघी सहा आहे.


सिव्हिल ‘कोविड’मुक्त
जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारपासून ‘नॉन कोविड’ सुविधा सुरू झाल्या. मात्र कालपर्यंत या रुग्णालयात दाखल सर्व कोविड रुग्णांना बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला असून, कोरोनावरील नियंत्रणात ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. रुग्णालयात दाखल केवळ एकमेव रुग्णास बुधवारी मोहाडी येथे सज्ज करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक भवन सोडले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT