जळगाव

कोरोनाचा विस्फोट; जळगाव जिल्ह्यात आज उच्चांकी १ हजार ६३ रुग्ण 

सचिन जोशी

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरुच आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार दिवसभरात कोरोनाचे आतापर्यंतचे एका दिवसातील उच्चांकी १ हजार ६३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येने ३० हजार ७००चा टप्पा पार केला. एकट्या जळगाव शहरात साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात पाचशेवर रुग्ण बरे होऊन गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. दररोज सहाशे, सातशे- आठशेच्या घरात रुग्ण आढळून येत असताना शुक्रवारी दिवसभरात १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात रुग्णसंख्या ३० जहार ७४९ झाली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे दररोजचे प्रमाणही चार-पाचशेवर आहे. आज दिवसभरात ५०२ रुग्ण बरे झाले, त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ८४५ झाली आहे. आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी ९ रुग्ण दगावले, त्यामुळे एकूण बळींची संख्याही ८४९वर पोचली आहे. आज मृत्यू झालेले सर्व रुग्ण ५५ वर्षांवरील आहे. 
 

जळगाव शहरात उद्रेक 
जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. दररोज शे-दीडशे रुग्ण आढळून येत असताना आज नव्या बाधितांची संख्या तब्बल ३६९ होती. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्याही ७ हजारांच्या टप्प्यात म्हणजे ६ हजार ९९० एवढी झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच भागात रुग्ण आढळून येत आहेत. व्यापारी पेठ, वाढीव वस्त्या, सेवावस्त्यांचा भाग आदी ठिकाणी संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. तर सर्वाधिक मृत्यूही जळगाव शहरातील असून शहरातील बळींची संख्या १६९ झाली आहे. आजही शहरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ३६९, जळगाव ग्रामीण ८४, भुसावळ ३१, अमळनेर ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, भडगाव ३१, धरणगाव २२, यावल ११, एरंडोल ७७, जामनेर ५०, रावेर १९, पारोळा १७, चाळीसगाव ८१, मुक्ताईनगर २५, बोदवड १९, अन्य जिल्ह्यातील १५. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT