Election 
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८ पालिका, पंचायत, नगर परिषदेची रणधुमाळी

राज्य शासनाच्या २७ जानेवारी २०२० सुधारित अध्यादेशानुसार बहुसदस्यीय प्रभागाऐवजी आता एकसदस्यीय प्रभागपद्धती लागू आहे.

देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात २०२० मध्ये मुदत संपुष्टात आलेल्या भडगाव, वरणगाव या पालिकांच्या (Municipality) निवडणुका कोविडमुळे (Covid-19) लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. या पालिकांसह मुदत संपुष्टात येत असलेल्या आणि निवडणुका होऊ घातलेल्या जिल्ह्यातील १८ नगर परिषद, पंचायतीच्या निवडणुका (Elections) लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. नव्यानेच होऊ घातलेल्या नशिराबाद नगरपंचायतीची निवडणूकही या वेळी होईल.

या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्ह्यात लवकरच निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. राज्य शासनाच्या २७ जानेवारी २०२० सुधारित अध्यादेशानुसार बहुसदस्यीय प्रभागाऐवजी आता एकसदस्यीय प्रभागपद्धती लागू आहे. यानुसार राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव, प्राप्त हरकती व सूचना सुनावणी, चक्रानुक्रमे आरक्षण निश्‍चितीसह आरक्षण सोडत आदी निवडणूक संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.


कोरोना संसर्ग कमी झाल्याने संविधानिक तरतुदीनुसार नगर परिषदेची, नगरपंचायतींची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. त्यात, राज्य शासनाच्या २७ जानेवारी २०२० च्या अध्यादेशानुसार सर्व नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एकसदस्यीय प्रभागपद्धती लागू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, जामनेर, भडगाव, भुसावळ, वरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर आणि शेंदुर्णी अशा १८ नगर परिषद, पंचायतींसोबतच नव्यानेच नशिराबाद नगरपंचायतीचीदेखील निवडणूक होऊ घातली आहे. या नगर परिषद, पंचायतींसाठी प्रभागरचना, टप्पेनिहाय प्रारूप प्रभागरचना, चक्रानुक्रम आरक्षण निश्‍चिती, अनुसूचित जाती-जमाती आरक्षित प्रभाग, प्रसिद्धी व हरकती, सूचना, सुनावणी, अंतिम प्रभागरचना व मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच संबंधित मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT