Farm Sowing Farm Sowing
जळगाव

आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीची टांगती तलवार

शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या जिल्ह्यात आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव ः शहरासह जिल्ह्यात तब्बल आठ दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) चिंतेचे सावट आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पाऊस झाला. मात्र, तो अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात झाला. यामुळे काही ठिकाणी जमिनीत ओल आहे, तर काही ठिकाणी जमीन कोरडी पडली आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची (Sowing)टांगती तलवार असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (jalgaon district rain on extension farmer farm double sowing crisis)

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मात्र, ती फोल ठरली आहे. जून महिन्यात जिल्ह्यात कोठे कमी, तर कोठे जास्त प्रमाणात १२३ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पेरण्या होऊन अनेक ठिकाणी उगवण झाली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, पाणी नसल्याने जमीन सुकत चालली आहे. आठ दिवस उन्हाची तीव्रता वाढत गेल्यास उगवलेली पिके पाण्याअभावी कोमजतील.

जिल्ह्यातील पारोळा, जामनेर, भुसावळ या तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे, तर अमळनेर, चोपडा पहाडी पट्ट्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी यंदाही कापूस, मका यांचा पेरा सर्वाधिक केला आहे. पाऊस पडल्यास शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. मात्र, पाऊस केव्हा येईल, हे आताच सांगणे कठीण आहे.

जिल्ह्यात १२३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. मात्र, तो कमी-अधिक प्रमाणात झाल्याने दिसत नाही. ६८ टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही, तर उगविलेली पिके वाया जातील. तोपर्यंत पाऊस पडेल, अशी आशा आहे.
-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT