Lockdown Lockdown
जळगाव

जळगाव जिल्ह्यात आजपासून निर्बंधांत वाढ!

एकावेळी पाचपेक्षा जास्त नागरिकांना जमण्यास बंदी असेल

देविदास वाणी


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे (Delta Plus) रुग्ण (Patient) आढळून आल्याने जिल्ह्यात लॉकडाउनचे (Lockdown) आदेश जारी करण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी आज (सोमवार) पासून सुरू होणार आहे. यात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने, हॉटेले सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच सुरू राहू शकतील. शनिवार व रविवारी सप्ताहअखेरला अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठ (Market) पूर्णतः बंद राहील.

(jalgaon district today restrictions increase in lockdown)

रात्रीची संचारबंदी
कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे. सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत मेडिकल इमर्जन्सी वगळता कुणालाही विनाकारण फिरता येणार नाही. यात पोलिस, महसूल, आरोग्य, महापालिका, अग्निशमन, पालिका, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूट राहील. जमावबंदी आदेशानुसार लग्न, अंत्यविधी वगळता सायंकाळी पाचपर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त नागरिकांना जमण्यास बंदी असेल.


हे राहणार सुरू
-अत्यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने
(किराणा, दूध, बेकरी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. पण, एकाच वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक नको.)
-मेडिकल दुकाने, रुग्णालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
-हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू.
चारनंतर रात्री नऊपर्यंत पार्सलद्वारे सुविधा.
-खुली मैदाने, सार्वजनिक ठिकाणे सायकलिंग व मॉर्निंग वॉकसाठी सकाळी पाच ते नऊपर्यंत सुरू राहतील.
-क्रीडाप्रकार, शूटिंग, तत्सम स्पर्धांसाठी सकाळी पाच ते नऊ ही वेळ असेल.
-लग्नसोहळ्यासाठी ५० व अंत्यविधीसाठी २० जणांची मर्यादा कायम असेल.
-बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय असल्यास अशी बांधकामे सुरू राहतील. दुपारी चारनंतर बांधकाम कामगारांना ये-जा करण्यास मनाई असेल.
-ई-कॉमर्स सुविधा, कृषीसंबंधी कामे, सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, आंतरजिल्हा प्रवास उद्योग आदी सुरू राहतील.


हे राहणार पूर्णपणे बंद
-शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था.
-चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल आदी पूर्ण बंद राहतील.


सप्ताहअखेरीस सर्व बंद :
किराणा, दूध, मेडिकल, बेकरी आदी जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सुविधांची दुकाने वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने शनिवारी, रविवारी पूर्णपणे बंद असतील.

५०० रुपयांचा दंड होणार

नागरिकांनी अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर पडताना मास्क लावणे, गर्दी न करणे, शारीरिक अंतर ठेवणे आदी नियम पाळणे बंधनकारक आहे. हे नियम न पाळणाऱ्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार असून, ही कारवाई कठोर स्वरूपात राबविण्यात येणार आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT