Girish Mahajan-Eknath Khadse 
जळगाव

खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले,त्यांना उपचाराची गरज-गिरीश महाजन

राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांना आपण मंत्री होवू असे वाटत होते, परंतू त्यांना साधे आमदार देखील होता आलेले नाही.

भूषण श्रीखंडे

जळगाव : माझ्यावर अनेक वर्षापासून एकनाथ खडसे (Eknath Khadse) बेछूट आरोप करत असून त्यांचा मला राग येत नाही. उलट त्यांची किव येत आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडत (Mental balance disturbed) चालले असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे दाखविण्याची गरज आहे असे म्हणत भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी खडसेंना खोचक टोला लगावत प्रतिउत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी यांनी बोदवड येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात मास्तरच्या मुलाकडे बाराशे कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली? असे नाव न घेता गिरीश महाजनांवर आरोप केले होते. त्यानुसार आज आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांविषयी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन खरेदी प्रकरणात केलेल्या व्यवहारात त्यांना मंत्री पद गमवावे लागले. ते म्हणता मी कोणता ही गैरव्यहार केला नाही तर ईडीच्या चौकशीला समारो का जात नाही. तिन वेळा कोरोना कसा होतो. तीन वर्षापूवीच्या घटनेवर माझ्यावर निंबोरा पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल ते करून घेत असल्याचे केविलवाणे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मला त्यांचा राग येत नाही. त्यांची किंव वाटत आहेत असे खोचक टोला महाजन यांनी खडसेंना यावेळी लगावला.

खडसेंना मानसोपचार तज्ञांची गरज

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंनी त्यांचे मंत्रीपद गमावले, त्यांच्या मुलीचा पराभव झाला ते भाज पक्ष सोडून गेले अशा वेळी त्यांनी अनेक आरोप माझ्यावर केले. परंतू राष्ट्रवादीत गेल्यावर त्यांना आपण मंत्री होवू असे वाटत होते, परंतू त्यांना साधे आमदार देखील होता आलेले नाही. त्यामुळे त्यातून त्यांचे मानसीक संतुलन बिघडलेले दिसत आहे. त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे असे श्री. महाजन म्हणाले.

वजन वापरा आणि करा चौकशी

एकनाथ खडसे सत्ताधारी पक्षात असून ते त्यांचे वजन वापरून खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहे. मी भाड्याच्या घरात राहत होतो, माझे वडील मास्तर होते. परंतू गावाला आमची शेती होती. त्याचे आता भाव वाढलेले आहे. ते म्हणतात मी राजदूत गाडीत राॅकेल टाकून फिरत होते तर त्यांच्याकडे कुठून एवढी शेती आली. अनेक शहरांमध्ये कसे काय त्यांचे बंगले आहे. माझ्याकडे बाराशे कोटीचा संपत्ती आहे असे ते म्हणतात तर तुमचे वजन वापरा आणि करा चौकशी असे खुले आव्हान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT