जळगाव

खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’, राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता 

सचिन जोशी

जळगाव : गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी वाढली. नंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबत आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वाला आव्हान दिले. 

गेल्या महिन्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली, त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या १५ दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. 


याचदरम्यान खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. मात्र, स्वत: खडसे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले. अखेरीस आज सकाळी खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट! १९७२ पेक्षाही गंभीर स्थिती; शेतकऱ्यांसाठी गुरुवारी विशेष योजनेची घोषणा हाेणार

Vegetarian Club Sandwich: उकडलेले बटाटे, कुरकुरीत भाज्या अन् आवडीच्या स्प्रेडसह झटपट बनवा चविष्ट व्हेजिटेरियन क्लब सँडविच!

ढिंग टांग : ऑपरेशन ‘स्पेसल २६’..!

Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर ओसरला; दुपारी उन्हाचा चटका वाढला, जाणून घ्या आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT