जळगाव

फटाके उडवा..मात्र डोळे जपा; दुर्घटनांचा धोका!

देविदास वाणी ः सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः दिवाळीत (Diwali celebration) सर्वच फटाक्यांची आतषबाजी (Fireworks) करण्याचा आनंद लुटतात. फटाक्यांचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. यात हाताला चटका लागण्यापासून मांसपेशी जळण्यापर्यंत त्रास होऊ शकतो. श्वसनाच्या त्रासासोबतच ध्वनिप्रदूषणामुळे (Noise pollution) आबालवृद्धांच्या ऐकू येण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. फटाक्यांमुळे डोळ्यांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे दिवाळीत डोळ्यांची व शरीराची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


डोळ्यांवर हे होतात दुष्परिणाम
फटाक्यांमुळे डोळ्यांना कधीही न भरून येणारी जखम होऊ शकते. पापण्या आणि कॉर्नियाला इजा होऊ शकते. फटाक्यांच्या धुरामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे यांसारखे त्रासही उद्‍भवू शकतात. डोळ्यांच्या कॉर्नियाला ओरखडे येऊ शकतात किंवा कायमचा पांढरा डाग पडू शकतो. डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला देखील गंभीर दुखापत होऊ शकते. तो भाग फाटू शकतो. डोळ्याच्या भिंगला, रेटिनालादेखील इजा होऊन कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.


फटक्यांची आतषबाजी करताना अशी घ्या काळजी
फटक्यांची आतषबाजी करताना संरक्षक गॉगल घाला. डोळ्यांना काही इजा झाल्यास घरच्या घरी उपचार न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नका, फटक्यांची आतषबाजी करताना त्यांचा संपर्क चेहरा, केस, कपड्यांसोबत येणार नाही याची काळजी घ्या. फटाके व शरीरामध्ये किमान हातभर अंतर ठेवा. फटक्यांची आतषबाजी करण्याच्या ठिकाणी बादलीभर पाणी किंवा रेती भरून ठेवा. फटक्यांची आतषबाजी करताना त्यावर डब्बा किंवा माती ठेवू नका. त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

फटक्यांची आतषबाजी करताना लहान मुलांना एकटे सोडू नका. घरातील मोठ्यांनी सोबत असावे. फटाके मोकळ्या जागेत उडवा. फटाके जमिनीवर ठेवून सुरक्षित अंतरावरून वात पेटवून लगेच दूर व्हा. डोळ्यांना इजा होणार नाहीत अशा पद्धतीने फटक्यांची आतषबाजी करा.
-डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

Belgaum Lok Sabha Election Results : बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांचा मोठा विजय; काँग्रेसच्या मृणाल हेबाळकरांचा पराभव

Thane Loksabha Result: शिंदे बालेकिल्ला राखणार? नरेश म्हस्केंना मिळाली मोठी आघाडी!

Kolhapur Constituency Lok Sabha Election Result: कोल्हापुरात जल्लोष सुरु... शाहू महाराज जवळपास फिक्स? संजय मंडलिकांची केली अडचण

India Lok Sabha Election Results Live : तब्बल दहा वर्षांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जल्लोष

SCROLL FOR NEXT