जळगाव

जळगाव शहरात मंगळवारपासून चार नवीन लसीकरण केंद्रे

देविदास वाणी

जळगाव ः शहरात लसीकरण (Vaccination) केंद्रावर (canter) होणारी गर्दी (crud) पाहता येत्या मंगळवारपासून चार नवीन लसीकरण केंद्रे शहरात सूरु करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय कोविड लसीकरण टास्क फोर्सच्या (task fores) बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान उद्यापासून (ता.९) सर्वच केंद्रावर फक्त कोविशिल्ड लसी देण्यात येतील. कारण को-व्हॅक्सीनचा (covaccine)साठा संपल्यागत जमा आहे. ज्यांनी अगोदर को-व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला असेल त्यांना दुसरा डोस मिळेल.

( four new vaccination centers jalgaon city tuesday)

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अध्यक्षस्थानी होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एच. पाटील, आयुक्‍त सतिश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एच. एस. चव्हाण, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

१४ ते ४५ वयोगटासाठी मेहरूण, गणपतीनगरात केंद्र
शहरातील नागरिकांसाठी ४ नवीन शासकीय कोविड लसीकरण केंद्रे मंगळवार (ता.११) पासून सुरु होतील. त्यात स्वाध्याय भवन (गणपती नगर), मुलतानी हॉस्पीटल (मेहरुण) ही दोन कोविड लसीकरण केंद्रे ही १८ ते ४५ वयोगट असलेल्या व्यक्‍तींसाठी असतील.

शनिपेठ, निमखेडीरोडला ४५ वर्षावरील गटासाठी केंद्रे
शाहीर अमरशेख दवाखाना (शनिपेठ), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड) जळगाव ही कोविड लसीकरण केंद्रे फक्त ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटासाठी असतील.


१८ ते ४५ वयोगटातील व्यक्‍तींना लसीकरणासाठी कोविड पोटर्ल/आरोग्यसेतु अँपवर
आनलाईन रजिष्ट्रेशन करणे व त्यानंतर वेळेसंवंधित व केंद्रासंबंधित नोंदणी करणे बंधनकारक
आहे. केवळ रजिष्ट्रेशन करुन वेळेची नोंदणी न करता किंवा रजिष्ट्रेशन च करता कोविड
लसीकरण केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. याबाबत पोलीस विभागाला आवश्यक सूचना
निर्गमित करण्यात आल्या आहेत. १८ ते ४५ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी सद्यस्थितीत मर्यादित
प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून नागरिकांनी संयम वाळगावा.

४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटासाठी रविवार (ता.९) व सोमवार (ता.१०) या दोन दिवसांत कोविशिल्डचा दुसरा डोस प्राधान्याचे देणेत येणार आहे. मंगळवार (ता.११) पासून कोविशिल्ड लसीकरणाचे लाभार्थीनिहाय दुसरा डोस व पहिला डोसचे अनुक्रमे ७०:३० असे प्रमाण राहील.

कूपन देताना चित्रीकरण होणार
४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रांवर रांगेत उभ्या
असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसी इतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंदवहीत नोंदी
घेण्यात येवुन कुपन वाटपाचे चित्रीकरण करण्यात येईल.

कोविशिल्ड लसींचा डोस अधिक असल्याने सर्वच वयोगटासाठी कोविशिल्ड लस देण्यावर भर राहणार आहे. ज्यांनी पहिला डोस कोव्हॅक्सीनचा घेतला आहे. त्यांनाच कोव्हॅक्सीनचा दूसरा डोस दिला जाणार आहे.

डॉ.बी.टी. जमादार
जिल्हा आरेाग्य अधिकारी

(four new vaccination centers jalgaon city tuesday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT