jalgaon meharun Lake 
जळगाव

गणरायाला निरोप देण्यासाठी मेहरुण तलाव सज्ज

गणेशोत्सव सुरू होऊन गुरुवारी सात दिवस झाले. सातव्या दिवशी अनेक नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन मेहरूण तलावात केले.

सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः येत्या रविवारी (ता. १९) अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जन (Ganesh Visarjan) आहे. त्यानिमित्त महापालिकेतर्फे मेहरूण तलाव (Jalgaon Municipal Corporation) विसर्जनासाठी सज्ज करण्याची तयारी सुरु आहे. तलावात मूर्ती विसर्जन करताना कोणाचा तोल जाऊन अपघात घडू नये, यासाठी तलावाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा कठडे उभारले जात आहे. याठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी खास तराफे तयार केले जात आहेत. सोबतच सुरक्षा दलातर्फे बोटींसह (Security Forces) पट्टीचे पोहणारे ठेवण्यात येणार आहे.


गणेशोत्सव सुरू होऊन गुरुवारी सात दिवस झाले. सातव्या दिवशी अनेक नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन मेहरूण तलावात केले. आता दहाव्या दिवशी सार्वजनिक विसर्जन होणार आहे. यादिवशी मेहरूण तलावात विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता येथे तगडा बंदोबस्त राहणार आहे. सोबतच नागरिकांना सूचना देण्यासाठी सूचना कक्षही स्थापन करण्यात येत आहे. पोलिसांसह होमगार्डही येथे ठेवणार आहे. ते नागरिकांना सुरक्षित मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतील. ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणुका जातात त्या मार्गावरील रस्त्यावर अनेक खड्डे तयार झाले आहेत. ते महापालिकेने आगामी दोन दिवसात बुजविले तरच विसर्जन मिरवणूक मार्गातील खड्ड्यांचे ‘विघ्न’ दूर होण्यास मदत होणार आहे.

मिरवणुकीवर बंदी
कोरोना संसर्गामुळे श्रींच्या विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. यामुळे गणेश मंडळांना मिरवणुकी काढता येणार नाही. तरी वाहनांद्वारे गणेशमूर्ती नेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुम्ही फक्त लिहा! गुरुजींनीच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या चीट, ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरं 'सेम टू सेम'; २६ शिक्षक निलंबित

ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची तब्येत बिघडली; लीलावती इस्पितळात दाखल; वडिलांच्या काळजीने भाईजानची इस्पितळात धाव

Eknath Shinde: पहलगाममध्ये मृत्युमुखी जगदाळेंच्या मुलीस सेवेत घ्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे महापालिकेस निर्देश!

Satara Crime: फलटणमधील दोघे तडीपार; सातारा पोलिस अधीक्षकांची कारवाई, विविध ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल!

T20 World Cup: कॅनडाच्या युवराजचा विश्वविक्रम! ११ चौकार, ६ षटकार अन् न्यूझीलंडविरुद्ध शतक, सुरेश रैनाचाही रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT