Collector Abhijit Raut Collector Abhijit Raut
जळगाव

महामार्गाची कामे, रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाणार

तरसोद ते चिखली महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आदेशित करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना (Corona) संसर्गाचे रुग्ण बोटावर मोजण्याएवढे आहेत. असे असले तरी नागरिकांना आगामी काही महिने काळजी घ्यावी लागेल. मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळावी लागेल. कोरोना संपल्यागत असल्याने आता जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाची (Highway for lenghte) रखडलेली कामे, प्रकल्पांना (Stalled projects) गती देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी ‘सकाळ’ला दिली.

(jalgaon highway forelength work and stalled projects Will speed up)

जिल्ह्यात तरसोद ते फागणे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. महामार्गाअभावी वाहतुकीची कोंडी, अपघात वाढत असल्याने हा महामार्गा लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने कामात अडचणी येत असल्या तरी हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सक्त सूचना आहेत. त्यासाठी दिल्लीतील महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करून संपर्कही साधला आहे.

चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे

तरसोद ते चिखली महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आदेशित करण्यात आले आहे. जळगाव ते औरंगाबाद महामार्गाचे चौपदरीकरणही सुरू आहे. त्यावरही नियंत्रण ठेवून आहे. आगामी वर्षभरात या तीनही मार्गाची कामे पूर्ण होऊन जिल्हाची दळणवळण व्यवस्था बळकट करण्यावर भर असेल.

समृद्धी महामार्गाला जोडणार

औरंगाबाद मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचेही काम सुरू आहे. जळगाव ते औरंगाबाद महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईला बायरोडने जाण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, मुंबई असा प्रवास कमी वेळेत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

PMP Bus: पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान; पीएमपीत १५९९ बस दाखल, मेट्रोचा २०० किलोमीटर विस्तार अर्थसंकल्पात जाहीर

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Hingoli News: तेलाचे दर १५ रुपयांनी वाढले; अमेरिका-इराण युद्धाची झळ आली स्वयंपाकघरापर्यंत

बापरे! शिवानी रांगोळेला नक्की काय झालं? हातात वॉकर घेतलेला फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT