जळगाव

पतीचा त्रास..आणि 'वट पौर्णिमे'ला तिने स्वताःला जाळून घेतले

अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

रईस शेख



जळगाव ः पतीच्या (Husband) गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यसनापायी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याच्या त्रासाला (Trouble) कंटाळून पंचेचाळीस वर्षीय विवाहीतेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न (Burning suicide try) केल्याची घटना मेहरूण परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उज्वला संजय पाटील (लाडवंजारी) वय 45 असे महिलेचे नाव आहे. दरम्यान उज्वला पाटील या 70 टक्के भाजल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

(husbands troubles his wife tried suicide by burning herself)

जिल्‍हा रुग्णालयात जमनेल्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार. उज्वला संजय पाटील (लाडवंजारी) रा.संतज्ञानेश्वर चौक, मेहरून ,जळगाव येथे आपल्या दोन मुलांसह राहतात. पती संजय पाटील याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आज उज्वला पाटील यांनी सायंकाळी 7:20 वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्या 70 टक्के भाजल्या गेल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मुख्य वैद्यकीय अधीकारी डॉ कळसकर यांनी गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी पाठविल्याचे सांगितले.

यावेळी परिसरातील नगरसेवक प्रशांत नाईक व कार्यकर्त्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उज्वला पाटील यांना मुलगी नेहा व मुलगा विशाल असे मुले आहेत मात्र मोठा मुलगा अक्षय संजय पाटील (लाडवंजारी) याने दोन वर्षांपूर्वी राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान उज्वला पाटील यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत नोद करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT