Malaria 
जळगाव

जळगाव बनले डेंगी, मलेरियाचे ‘हॉटस्पॉट’; घराघरांत रुग्ण

दुसऱ्या लाटेतून सावरल्यानंतर जळगाव शहरात डेंगी, मलेरिया, टायफॉइड, कावीळ यांसारख्या साथरोगांनी थैमान घातले आहे.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : शहरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून साथरोगांनी थैमान (Infectious diseases) घातले असून, घराघरांत डेंगी(Dengue), मलेरिया(Malaria), टायफॉइडचे (Typhoid) रुग्ण आहेत. साथरोगांबाबत शहर हॉटस्पॉट बनलेले असताना महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) दरबारी मात्र या रुग्णांची विशेष नोंदही नाही आणि साथरोग निवारणासाठी मनपाकडून कोणतीही ठोस उपाययोजही नाही. कोरोनाच्या (Corona Wave) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जळगाव शहर राज्यातच नव्हे तर देशात ‘हॉटस्पॉट’ ठरले. दोन्ही लाटांमधून शहर आणि जिल्हा कसेबसे सावरले.

अन्य साथरोगांचे थैमान
दुसऱ्या लाटेतून सावरल्यानंतर जळगाव शहरात डेंगी, मलेरिया, टायफॉइड, कावीळ यांसारख्या साथरोगांनी थैमान घातले आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शहरात या रोगांची मोठी साथ पसरली असून, घराघरांत रुग्ण सापडत आहेत. शहरात जवळपास ८५ हजार मालमत्ता आहेत. पैकी, निम्म्याहून अधिक घरांमध्ये किमान एक आणि २० टक्के घरांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. ५ टक्के घरांमध्ये कुटुंबातील सर्वच सदस्य आजारी असल्याचे सांगितले जात आहे.

बालरोग हॉस्पिटल फुल
डेंगी, टायफॉइडसारख्या आजारांनी सर्वाधिक प्रभावित बालवर्ग झाला आहे. बहुतांश घरांमधील २ ते १२ वर्षे वयोगटातील बालके डेंगी, टायफॉइडने बाधित असून, बालरोगतज्ज्ञांची हॉस्पिटल, दवाखाने फुल आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळणे कठीण झाल्याचे जळगावने अनुभवले. तशीच स्थिती आज शहरातील बालरुग्ण हॉस्पिटल्सची आहे.

महापालिका उदासीन
गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सातत्याने पाऊस पडत असून, त्यामुळे शहरात वाढलेली अस्वच्छता, साचलेली डबकी रोगांना निमंत्रण देत आहेत. महापालिका प्रशासन मात्र पूर्णपणे सुस्त असून, पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दुसऱ्याच कामांमध्ये ‘रस’ असल्याचे दिसत आहे. शहरात साथरोगांचे थैमान असताना कुठेही साफसफाई, जंतुनाशक फवारणी, धूरफवारणी होत असल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी हे काम सुरू असले तरी मर्यादित आहे. साथरोगांच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी व अन्य सर्व उपाययोजनांबाबत आदेश दिले आहेत. या उपाययोजना आणखी प्रभावीपणे राबविल्या जातील.


महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. साथरोग थैमान घालत असताना प्रशासन व पदाधिकारी उदासीन आहेत.
-भगत बालाणी, गटनेता, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT