जळगाव

जिल्हा कारागृहात फिनाईल पिऊन कैदाने आत्महत्येचा केला प्रयत्न 

देविदास वाणी

जळगाव ः खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या  कैद्याने कारागृहात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी केला. कैद्यावर तातडीने उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

खूनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला संतीलाल उर्फ शातांराम पावरा हा १ एप्रिल २०१९ पासून कारागृहात आहे. याठिकाणी तो बंदिवानांसाठी जेवण तयार करणार्‍या स्वयंपाक गृहात स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. रविवारी पाकगृह अंमलदार म्हणू हिरवकर हे ड्युटीवर असतांना संतीलाल याने त्याचे मेव्हणे राजू सखाराम पावरा यांच्यासोबत आज सकाळी ९.४२ वाजेच्या सुमारास फोनवर बोलला. त्यानंतर त्याला चक्कर व उलट्या झाल्याने त्याला इतरांच्या मदतीने कारागृहात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान संतूलाल याची चौकशी करुन काय झाले ? याबाबत विचारणा केली असता त्याने साईसफाईसाठी वापरले जाणारे फिनाईल पिल्याचे त्याने हिवरकरांना सांगितले. 

तत्काळ उपचारासाठी दाखल केले 
कैदी संतीलाल याने फिनाईल पिल्याचे सांगताच कारागृह रक्षक विक्रम हिवरकर, दत्ता खोत, अमित पाडवी, सीताराम हिवारे यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्याविरुद्ध विक्रम हिवरकर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत. 


मग मी मरुन जाऊ का? 
फिनाईल पिण्या अगोदर संतीलालने मेव्हण्याला फोन केला होता. पोलिसांनी या फोनची रेकॉर्डींग तपासणी केली असता. ती पावरी भाषेत त्याचे संवाद साधला होता यामध्ये सूंतीलाल याने मेव्हण्यास मला माझ्या घरचा नंबर द्या असे सांगितले. परंतु मेव्हण्याने माझ्याकडे नंबर नसल्याचे सांगितले असता सूंतीलालने मग मी मरुन जाऊ का? माझ्या बाईचे दागिने विका, वकील लावा आणि माझा जामीन करा असा संवाद त्या दोघांमध्ये फोनवर संवाद झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच सूंतीलालने फिनाईल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT